भुसावळ – शहरातील पंचशील नगर,मच्छी मार्केट जवळ आडोशाला एक इसम कल्याण सट्टा जुगार नावाचा खेळ खेळत असताना मिळून आल्याने स्थनिक गुन्हे शाखेचे कर्मचाऱ्यांनी जुगार अड्यावर छापा टाकून १३,७५० रुपये रोख व सट्टा जुगाराचे साहित्य जप्त केले.शेख नासिर दस्थगिर शेख असे संशयितांचे नाव आहे.
स्थनिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली की, भुसावळ शहरातील पंचशील नगर,मच्छी मार्केट जवळ आडोशाला सट्टा जुगाराचे खेळ सुरू आहे.रवी,नरवाडे,गोपाल गव्हाळे,पाटील,विकास सातदिवे, प्रशांत परदेशी,राहुल वानखेडे अशांना दालनात बोलावून कारवाई करण्याचे आदेश दिले.खाजगी वाहनाने पथक भुसावळ पोहचून मिळालेल्या माहितीची खात्री करून सापळा रचून जुगार अड्ड्यावर छापा टाकला असता दोन इसम हे पोलीसांना पाहून पळून गेले पोलिसांनी संशयित शेख नासिर दस्तगिर शेेेख यास ताब्यात घेवून त्यांच्याकडून १३,७५० रुपये रोख व सट्टा जुगाराचे साहित्य ता.४ रोजी जप्त केले.


























