भुसावळ – शहरातील वार्ड क्रमांक 20 मध्ये नगरसेवक राज चौधरी ॲक्शन मोडवर आले.तसेच निवदणुकींच्या तोंडावर नागरिकांना दिलेले शब्द व वचन नामा आता विकास कामांच्या माध्यमातून पूर्ण होतांना दिसत आहे.अशी प्रतिक्रिया देतांना राज चौधरी म्हणाले देखो अभि आगे आगे होता है क्या? अभि यो ये झाकी है,पुरे पाच साल बाकी है.असेच विकास कामे करून नागरिकांच्या समस्था सोडवणार.

प्रभाग क्रमांक २० मध्ये नगरसेवक राज चौधरी यांच्या माध्यमातून विविध विकासकामे सुरू असून रस्ते, स्वच्छता व मूलभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होत आहे. नगरसेवक म्हणून राज चौधरी निवडून आल्यानंतर वार्डात सातत्याने कामे होत असल्याने मतदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. विकासकामांच्या गतीमुळे “नागरिक खुश आहे” अशी भावना मतदार व्यक्त करत आहेत.


































