Homeताज्या बातम्यामोर धरण परिसरातील शासकीय जमीन तात्काळ रिकामी करण्याचे आदेश

मोर धरण परिसरातील शासकीय जमीन तात्काळ रिकामी करण्याचे आदेश

भुसावल – मोर धरणालगत हिंगोणे व बोरखेडा बुद्रुक ता .यावल परिसरातील शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे शेती करणाऱ्या अथवा ताबा घेतलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ जमीन रिकामी करावी, असे आदेश तापी खोरे सर्वेक्षण व अन्वेषण उपविभाग, जळगाव यांनी दिले आहेत.

सहाय्यक अभियंता श्रेणी-१ नितीन बाविस्कर यांनी यासंदर्भात नोटीस जारी केली असून संबंधित जमिनी जळगाव मध्यम प्रकल्प विभाग क्र. १ यांच्या नावे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या जमिनी वनविभागाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने त्या शासनाच्या अधिकृत ताब्यात आहेत. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीस या जमिनीवर शेती करणे, ताबा घेणे किंवा अन्य कोणताही वापर करण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रशासनाच्या सूचनेनुसार, सदर जमिनीवर सध्या शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी पिके, बियाणे व इतर साहित्य स्वतःच्या खर्चाने त्वरित हटवावे. या प्रक्रियेदरम्यान होणाऱ्या कोणत्याही नुकसानीसाठी शासन अथवा वनविभाग जबाबदार राहणार नसल्याचेही नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम ५०, ५३ व ५४ अंतर्गत या जमिनी संरक्षित असून अतिक्रमण न हटविल्यास बळजबरीने निष्कासनाची कारवाई करण्यात येईल. तसेच अतिक्रमणधारकांचे साहित्य जप्त करण्याची कारवाईही केली जाऊ शकते, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

दरम्यान, या संदर्भातील सूचना संबंधित गावांमध्ये दवंडी देऊन प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले असून तहसीलदार, तलाठी व संबंधित महसूल यंत्रणेला पुढील कार्यवाहीसाठी कळविण्यात आले आहे.

बोदवड सिंचन योजनेसाठी मोर प्रकल्पाची ७७.१६ हेक्टर शासकीय जमीन प्रस्तावित
बोदवड परिसर सिंचन योजना अंतर्गत टप्पा-१ मधील जुनोने धरणाच्या वनजमीन संपादन प्रस्तावासाठी आवश्यक असलेल्या भरपाई वनीकरणाच्या (कॉम्पेन्सेटरी अफॉरेस्टेशन) जमिनीसाठी यावल तालुक्यातील मोर प्रकल्पाच्या ताब्यातील शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

तापी खोरे सर्वेक्षण व अन्वेषण विभागीय पथक, जळगाव यांच्या मार्फत हा प्रस्ताव सादर करण्यात आला असून, बोरखेडा बुद्रुक (ता. यावल, जि. जळगाव) येथील विविध गट क्रमांकांमधील जमीन या उद्देशासाठी प्रस्तावित करण्यात आली आहे. गट क्रमांक ५४६/१, ५४७/१, ५४८/पै, ५४९, ५५०, ५५१, ५५२, ५५४/१, ५५९, ५६०, ५६१, ५६२, ५६३, ५६४, ५६६/१, ५६७, ५६९, ५७०, ५७१/१, ५७४/१, ५७५, ५७६, ५७७, ५७८, ५७९, ५८०, ५८१ आणि ५८२ या एकूण २९ गट क्रमांकांतील जमीन प्रस्तावात समाविष्ट आहे.

सदर जमिनीचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ७७.१६ हेक्टर असून ही जमीन वनविभागाकडे भरपाई वनीकरणासाठी हस्तांतरित करण्याची कार्यवाही प्रस्तावित आहे. जुनोने धरणासाठी आवश्यक वनजमिनीच्या बदल्यात पर्यायी जमीन उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेत हा प्रस्ताव महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

सहाय्यक अभियंता एन. डी. बाविस्कर यांनी या संदर्भातील क्षेत्र विवरणपत्र तयार करून पुढील कार्यवाहीसाठी सादर केले आहे. प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर वनजमीन हस्तांतरणाची प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण होण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

बोदवड परिसर सिंचन योजनेसाठी मोर प्रकल्पाची ४८.६४ हेक्टर पर्यायी जमीन प्रस्तावित बोदवड परिसर सिंचन योजना, ता. बोदवड, जि. जळगाव अंतर्गत टप्पा-१ मधील जुनोने धरणाच्या वनजमीन संपादन प्रस्तावासाठी आवश्यक असलेल्या पर्यायी जमिनीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, यासाठी मोर प्रकल्प, ता. यावल येथील शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

कार्यकारी अभियंता, तापी खोरे सर्वेक्षण व अन्वेषण विभागीय पथक, जळगाव यांच्या मागणीनुसार मौजे हिंगोणे, ता. यावल येथील विविध गट क्रमांकांमधील एकूण सुमारे ४८.६४ हेक्टर क्षेत्र भरपाई वनीकरणासाठी राखीव करण्यात आले आहे. या क्षेत्रामध्ये गट क्रमांक १२४५/२, १२४६, १२४८, १२४९, १२५०, १२५१, १२५२ तसेच इतर गट क्रमांकांचा समावेश आहे.

वन (संवर्धन) अधिनियमांतर्गत कोणत्याही प्रकल्पासाठी वनजमीन हस्तांतरित करताना त्याबदल्यात समतुल्य क्षेत्रफळाची पर्यायी जमीन उपलब्ध करणे बंधनकारक असते. त्यानुसार जुनोने धरणासाठी आवश्यक असलेल्या वनजमीन संपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी मोर प्रकल्पाच्या हद्दीतील उपलब्ध शासकीय जमीन भरपाई वनीकरणासाठी प्रस्तावित करण्यात आली आहे.

या प्रस्तावामुळे बोदवड परिसर सिंचन योजनेच्या वनविषयक मंजुरी प्रक्रियेला चालना मिळणार असून, प्रकल्पाच्या पुढील टप्प्यातील कामांना वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भविष्यात या योजनेमुळे बोदवड परिसरातील शेतीला सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध होऊन कृषी विकासाला चालना मिळणार आहे.

सहाय्यक अभियंता, तापी खोरे सर्वेक्षण व अन्वेषण उपविभाग, जळगाव यांनी संबंधित प्रस्ताव तयार करून पुढील कार्यवाहीसाठी सादर केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जामनेरमध्ये बेकायदेशीर HTBT कापूस बियाण्यांवर धाड ; ९.१५ लाखांचा साठा जप्त, चौघांविरुद्ध गुन्हा

0
जामनेर, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यात प्रतिबंधित व बेकायदेशीर HTBT (हर्बिसाइड टॉलरंट बीटी) कापूस बियाण्यांच्या साठवणूक व विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत जामनेर पोलिसांना मोठे...

भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद

0
भुसावळ : येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली....

काँग्रेसचे भीष्म पितामह अनंतराव थोपटे यांचे निधन; ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  …

0
भोर प्रतिनिधी :- ( संतोष मोहिते )महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि निष्ठावान नेतृत्व, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भोर - वेल्हा - मुळशी...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी तपास वेगात; आरोपींकडून घटनास्थळी पुनर्रचना, उर्वरित तिघांचा शोध सुरू

0
भुसावळ शहरातील व्हीआयपी कॉलनीतील तरुणाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून महत्त्वाची माहिती मिळविण्यासाठी घटनास्थळी पुनर्रचना केली. गुरुवारी रात्री...

बोरखेडा हत्याकांडातील आरोपीला दुहेरी फाशी

0
१०४ पानी निकालात आरोपीच्या क्रौर्यावर न्यायालयाचे ताशेरे; भुसावळ सत्र न्यायालयाच्या इतिहासातील पहिली फाशीची शिक्षा भुसावळ : राज्यभरात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या बोरखेडा येथील चार निष्पाप भावंडांच्या...

error: Content is protected !!