Homeक्राईमकुरंगवडी येथे धान्य भरडण्याच्या मशीनमध्ये स्कार्फ अडकून महिलेचा मृत्यू

कुरंगवडी येथे धान्य भरडण्याच्या मशीनमध्ये स्कार्फ अडकून महिलेचा मृत्यू

भोर ( संतोष मोहीते भोर ) तालुक्यातील कुरंगवडी येथे धान्य भरडण्याच्या मशीनमध्ये स्कार्फ अडकल्याने एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. 21 फेब्रुवारी) सकाळी घडली. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

कुरंगवडी येथील शुभांगी निलेश राउत (वय 41) या सकाळी सुमारे 10.30 वाजण्याच्या सुमारास गावातील शेतामध्ये ट्रॅक्टरला जोडलेल्या धान्य भरडण्याच्या मशीनजवळ काम करत होत्या. यावेळी त्यांच्या डोक्याला बांधलेला स्कार्फ अचानक मशीनमध्ये अडकला. मशीन सुरू अवस्थेत असल्याने त्या त्यात ओढल्या गेल्या आणि गंभीर जखमी झाल्या.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईक जयेंद्र सुरेश राउत तसेच गावातील नागरिक संतोष कुंडलीक शिळीमकर, संतोष सर्जेराव शिळीमकर आणि ट्रॅक्टर चालक जगन्नाथ रघुनाथ कांटे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्यांना मशीनमधून बाहेर काढले. गंभीर अवस्थेत त्यांना तातडीने नसरापूर येथील सिद्धीविनायक हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना दुपारी 12.03 वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी राजगड पोलीस ठाणे येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यूबाबत कोणावरही संशय नसल्याचे नातेवाईकांनी नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार निंबाळकर करीत असून दाखल अंमलदार म्हणून पोलीस हवालदार प्रधान यांनी काम पाहिले. प्रकरणाचा तपास प्रभारी पोलीस निरीक्षक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ : जनगणना 2027 साठी स्व-गणना प्रक्रियेची माहिती जाहीर

0
भुसावळ : आगामी जनगणना 2027 च्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी स्व-गणना (Self Enumeration) प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून त्याबाबत प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत....

लापरवाही से वाहन चलाने पर एक वर्ष की सजा, आरोपी दोषी करार

0
बुरहानपुर (म.प्र.), 30 अप्रैल 2026 — जिला लोक अभियोजन अधिकारी कार्यालय द्वारा जारी प्रेस विज्ञप्ति के अनुसार, सड़क दुर्घटना के एक मामले में न्यायालय...

लोक अदालत में पारिवारिक मसलो से सम्बन्धित मामलो का निराकरण मध्यस्थता के माध्यम से...

0
बुरहानपुर .- वर्ष 2026 की द्वितीय लोकअदालत का आयोजन 9 मई 2026 वार शनिवार को कुटुंब न्यायलय (फॅमिली कोर्ट) बुरहानपुर में होना है l...

मध्यस्थतेतून कौटुंबिक वादांचा निकाल – प्रधान न्यायाधीश तनवीर अहमद खान

0
बुरहानपूर (नि.प्र.) : वर्ष 2026 मधील दुसरी राष्ट्रीय लोकअदालत येत्या 9 मे रोजी, शनिवार, कुटुंब न्यायालय (फॅमिली कोर्ट) बुरहानपूर येथे आयोजित करण्यात येणार आहे....

पत्रकार करणार न्यायासाठी आंदोलन.

0
अदखलपात्र गुन्ह्या ऎवजी सदर प्रकरणात FIR नोंद न केल्यास राम पाचकाळे जिल्हाधिकार्यालयावर करणार आंदोलन. पत्रकारलाच न्याय नसेल मिळत तर सर्व सामान्यांचं काय ❓ कापूरहोळ (मीनाक्षी ताई पोळ...

error: Content is protected !!