Homeराजकीयभुसावळला महाविकास आघाडी व मित्रपक्षांची बैठक संपन्न !

भुसावळला महाविकास आघाडी व मित्रपक्षांची बैठक संपन्न !

भुसावळ – शहरातील जामनेर रोडवरील डॉ. मानवतकर यांच्या हॉस्पिटलमध्ये दि.२७ रोजी दुपारी १.०० वाजेला विधानसभा निवडणुकीचे  महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. राजेश मानवतकर यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडी व मित्रपक्षांची बैठक संपन्न झाली.
विधानसभा निवडणूका सुरू झालेल्या असून भुसावळ विधानसभेची जागा ही काँग्रेस पक्षाच्या वाटेवर आल्याने महाविकास आघाडी  तर्फे नैवखा चेहरा डॉ.राजेश मानवतकर यांची उमेदवारी निश्चित केलेली आहे.खरंतर भुसावळ विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र गटाला) जागी मिळायला हवी होती. मात्र मुक्ताईनगरच्या राष्ट्रवादी पक्षांच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांना राष्ट्रवादी पार्टी (शरदचंद्र गटाची) उमेदवारी मिळण्यासाठी पक्षांने दोन पाऊल मागे घेवून भुसावळ विधानसभेची राष्ट्रवादी पार्टी (शरदचंद्र गटाची) जागा ही रद्द करून काँग्रेस पक्षांच्या वाटेवर आली व पक्षाने दिल्ली वरून अधिकृत घोषणा करीत भुसावळ विधानसभेची उमेदवारी डॉ.राजेश मानवतकर यांना दिली. दिनांक २९ ऑक्टोबर रोजी डॉ.राजेश मानवतकर आपले नामांकन अर्ज सकाळी १०.०० वाजेला भरणार असून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने जामनेर रोडवरील अष्टभुजा मंदिर जवळ उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.सदरील रॅली ही अष्टभुजा मंदिर पासून निघणार असून सांगता प्रांत अधिकारी कार्यालयाच्या परिसरात होईल.
विधानसभा निवडणूक नैवखा चेहरा लढवीत आहे.आरोप अत्यारोप होणारच सर्व कार्यकर्त्यांनी सुरुवातीपासून बेस लेव्हलवर काम करायचे आहे.उमेदवाराला बूथ,कमेटी तसेच पदाधिकाऱ्यांकडून काय काम करून घ्यायचे आहे हे माहिती नाही यासाठी सर्वांनी एकत्र यायचे आहे.ज्याप्रमाणे राहुल गांधी, शरदचंद्र पवार तसेच उद्धव ठाकरे ही नेते मंडळी व तिघ पक्ष कधीही एकत्र येणारे नव्हते मात्र लोकशाही वाचवण्यासाठी हे सर्व एकत्र आले त्याप्रमाणे सर्वांनी एकजुटीने आपण स्वतः उमेदवार आहे असे भासवून काम करायचे आहे.जनतेचे,आरोग्याचे,बेरोजगारीचे प्रश्न सोडवायचे असेल तर नक्की विधानसभेत परिवर्तन करीत नैवखा चेहऱ्याला विधानसभेत पोचवायचे आहे.
रावणाचा भाऊ कुंभकर्ण जसा सहा महिने झोपायचा त्याला उठवण्यासाठी नगारे,ढोल – ताशे वाजवावे लागत होते तसे १५ वर्षांपासून झोपलेल्या कुंभकर्णाला कार्यकर्त्यांनी ढोल – ताशे वाजविले.उठा- उठा विधानसभा लागली आहे.फटाक्यांची अतिष बाजी केली तरी सुद्धा उठले नाही.अखेर शेवटी ठेकेदार धावत आले “आप सोते रहेंगे तो हमार क्या होंगा” कुंभकर्ण जागा झाला डोळे चोळत १५ कोटीचे संकुल, रस्त्याचे उदघाटन झोपेतच केले.१५ वर्षात अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाले,गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्या.मर्डर झाले गुन्ह्याचे प्रमाण सोबत बेरोजगारीही वाढली मात्र कुंभकर्ण जागी झालेला नाही अशाला कायमचे झोपवायचे आहे तसेच गाडून टाकायचे आहे.स्वच्छ, सुशिक्षित, नम्र आमदार हवा आहे व महाविकास आघाडीने अतिशय योग्य उमेदवार भुसावळ विधानसभेसाठी मिळालेला आहे.राक्षस गडायचा आहे आणि विधानसभा काँग्रेसमय करायची आहे असे रोखठोक ऑल इंडिया बहुजन विकास पार्टीचे अध्यक्ष मोहन निकम यांनी महाविकास आघाडी व मित्रपक्षांची बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधित केले.याप्रसंगी माजी आमदार दिलीप भोळे,डॉ.जगदीश पाटील( निरीक्षक), राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रवींद्र निकम, राष्ट्रवादी पक्षाचे राजेंद्र चौधरी तसेच शिवसेना उबाठा गटाचे व भीमशक्ती पक्षाचे पदाधिकारी तसेच महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
भुसावळ तालुक्यातील नागरिकांना १५ वर्षांपासून भोगत असलेल्या नरक यातनेपासून खरोखर सुटका मिळवायची असेन तसेच घाणीचे साम्राज्य, कमकुवत पाणी पुरवठा योजना,बेरोजगार तसेच तालुक्यातील व्यवसायिक बाहेर गावी जावून आपले व्यवसाय करीत आहे यादरम्यान अनेक व्यापाऱ्यांचे अपघात होवून मृत्युमुखी पडले आहेत एवढेच नव्हे तर रस्त्यांची बिकट अवस्था आहेत.रस्त्यावरून उडणारे व दिपनगरच्या चिमणी मधून हवेत पसरणारे धुळीचे कणांमुळे फुफुसाचे आजार उदभवत आहे.जिल्ह्या परीषद शाळा बंद च्या मार्गावर आहेत असे अनेक प्रश्न निर्माण करणाऱ्यापासून सुटका मिळवायची असेल तर परिवर्तन होणे गरजेचे आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राजापूर येथे ट्रान्सफॉर्मर फोडून 80 किलो वजनाच्या कॉपर कॉईलची चोरी; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल!

चोरट्याने विद्युत पोलवरील 100 kv डीपीचा ट्रान्सफॉर्मर खाली पाडून त्यातील 80 किलो वजनाची कॉपरची कॉईल चोरली.. पोलीस वार्ता, राजापूर | भोर तालुक्यातील राजापूर येथे शेतातील...

सहा पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल देवळाली कॅम्प येथे त्यांचा सत्कार!

पोलीस दलातील धाडसी व उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाने 'राष्ट्रपती पदक' देऊन केले सन्मानित.. पोलीस वार्ता, देवळाली | महाराष्ट्र पोलीस दलातील नाशिक शहर पोलीस गुन्हे शाखा...

कावड़ यात्रा में ऊमडा जन सैलाब

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के शाहपुर क्षेत्र के ग्राम पिपरी से खड़कोद तक निकली भव्य कावड़ यात्रा: गुप्तेश्वर महादेव मंदिर में पुजा-हवन के साथ संपन्न ​बुरहानपुर।...

28 पंप ऑपरेटरों का प्रशिक्षण संपन्न

0
जिम्मेदारियों एवं तकनीकी कार्यों की दी गई जानकारी रमाकांत मोरे । बुरहानपुर जिले के देड़तलाई। में आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रम (भारत) के अंतर्गत आज...

ग्राम विकास मे सहभागी होंगे छात्र छात्राएं ।

0
रमाकांत मोरे । मध्य प्रदेश जन अभियान परिषद जिला बुरहानपुर के विकासखंड बुरहानपुर एवं खकनार में मुख्यमंत्री सामुदायिक नेतृत्व क्षमता विकास पाठ्यक्रम का सत्रारंभ...

error: Content is protected !!