Homeआरोग्यबारामतीत तंत्रज्ञानाच्या नवदृष्टीची क्रांती; टेक्नॉलॉजी डेमोन्स्ट्रेशन लॅबचे उद्घाटन!

बारामतीत तंत्रज्ञानाच्या नवदृष्टीची क्रांती; टेक्नॉलॉजी डेमोन्स्ट्रेशन लॅबचे उद्घाटन!

शरद पवार यांनी सांगितले की, ‘ही लॅब नव्या पिढीला विज्ञानाच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी एक महत्त्वपूर्ण माध्यम ठरेल..

पोलीस वार्ता, बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने आणि बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेल्या सायन्स अ‍ॅन्ड इनोव्हेशन अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर येथील टेक्नॉलॉजी डेमोन्स्ट्रेशन लॅबचे उद्घाटन नुकतेच उत्साहात बारामतीत संपन्न झाले. या प्रसंगी विविध मान्यवरांची उपस्थिती लावली.
कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मा.शरद पवार यांनी सांगितले की, ‘ही लॅब नव्या पिढीला विज्ञानाच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी एक महत्त्वपूर्ण माध्यम ठरेल. बारामती हे आता शैक्षणिक केंद्र बनले असून येथील विद्यार्थी देश-विदेशात आपली गुणवत्ता सिद्ध करत आहेत. कृषी क्षेत्रात उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र व राज्य शासन ‘एआय’ (Artificial Intelligence) तंत्रज्ञानाचा वापर करत असून त्यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता तंत्रज्ञानावर आधारित शेतीकडे वळण्याची गरज आहे.
यावेळी ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ.अनिल काकोडकर यांनी लॅबचे कौतुक करताना सांगितले की, ‘ही लॅब एक पथदर्शी प्रकल्प आहे. राज्यातील इतर पाच ठिकाणीही अशा प्रकारची केंद्रे उभारण्यात येणार आहेत. विज्ञानयुक्त शिक्षण, संशोधनवृत्ती, आणि कृतीशील प्रयोग यासाठी असे केंद्र अत्यंत उपयुक्त आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी प्रत्येक शाळेत अशा सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्यवरांसोबत टेक्नॉलॉजी डेमोन्स्ट्रेशन प्रोजेक्टअंतर्गत उभारण्यात आलेल्या व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी, रोबोटिक्स लॅब, सायन्स ऑन स्पिअर, होलोग्राम टेक्नॉलॉजी आदी नाविन्यपूर्ण प्रकल्पांची पाहणी केली. यावेळी सेंटरच्या प्रमुख हिना भाटिया यांनी प्रकल्पांची माहिती दिली.

  • सुरुवातीस राजेंद्र पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले
या कार्यक्रमात विद्यानिकेतन ट्रस्ट आणि कल्पना चावला स्पेस अकादमी, लोणावळा यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे अंतराळ शिक्षण, शिक्षक प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला अधिक चालना मिळणार आहे. याशिवाय संशोधनाच्या माध्यमातून पेटंट प्राप्त प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला.

ही लॅब केवळ बारामतीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या दिशेने एक नवा टप्पा ठरणार आहे, हे निश्चित.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी : वर्षा चव्हाण, बारामती, संपर्क: 9763852891
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्यात ढगाळ हवामान, मेघगर्जनेसह वादळी पाऊस, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सतर्कता इशारा!

संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ते प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन.. पोलीस वार्ता, मुंबई : राज्यात पश्चिम भागात, घाट परिसर, खानदेश, मराठवाडा...

सोशल मीडियावर कोणतीही अफवा शेअर करताना खबरदारी बाळगावी -नाशिक पोलीस!

महिला छळ प्रकरणात पोलिसांनी तात्काळ व कठोर कारवाई केली असून नागरिक, माध्यमांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल पोलिसांनी आभार व्यक्त केले.. पोलीस वार्ता, नाशिक : शहरात घडलेल्या एका...

बैंक सुरक्षा को लेकर बुरहानपुर पुलिस अलर्ट

0
बुरहानपुर पुलिस द्वारा जिले में बैंकों की सुरक्षा व्यवस्था का निरीक्षण बैंक सुरक्षा चेकिंग को लेकर थाना प्रभारियों एवं स्टाफ ने किया व्यापक निरीक्षण दिनांक 18.04.2026...

“बुरहानपुर पुलिस का अनोखा अभियान

0
‘सृजन, सम्मान और अभिमन्यु’ से बालिकाओं को बनाया सशक्त” बुरहानपुर, 18 अप्रैल 2026 (प्रेस नोट): महिलाओं एवं बालिकाओं की सुरक्षा और सशक्तिकरण के उद्देश्य से बुरहानपुर...

जल गंगा संवर्धन अभियान

0
प्रभारी मंत्री श्री सिलावट ने किया हसनपुरा तालाब गहरीकरण कार्य का शुभारंभ प्रभारी मंत्री श्री तुलसीराम सिलावट ने ग्रामीणजनों के बीच बैठकर किया संवाद बुरहानपुर/18 अप्रैल,...

error: Content is protected !!