Homeआरोग्यनिष्पक्ष आणि खुल्या वातावरणात निवडणुका पार पडतील याची दक्षता घ्या; विशेष सामान्य...

निष्पक्ष आणि खुल्या वातावरणात निवडणुका पार पडतील याची दक्षता घ्या; विशेष सामान्य निरीक्षक राम मोहन मिश्रा!

श्री.मिश्रा यांनी यावेळी नाशिक जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील निवडणूक विषयक तयारीचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज श्री.मिश्रा यांनी निवडणूक विषयक तयारीचा आढावा घेतला.
पोलीस वार्ता, नाशिक | महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघात नि:पक्ष आणि खुल्या वातावरणात निवडणुका पार पडतील, यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेने दक्षता घ्यावी. त्यासाठी आवश्यक तेथे प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी सूचना महाराष्ट्रासाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले विशेष सामान्य निरीक्षक राम मोहन मिश्रा यांनी केली.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज श्री.मिश्रा यांनी निवडणूक विषयक तयारीचा आढावा घेतला. यावेळी भारत निवडणूक आयोगाने विविध विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त केलेले सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक, खर्च निरीक्षक, स्वीप साठीचे निरीक्षक, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा, नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे तसेच संबंधित मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.
श्री.मिश्रा यांनी यावेळी नाशिक जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील निवडणूक विषयक तयारीचा आढावा घेतला. संबंधित मतदारसंघाची स्थिती, तेथील मतदान केंद्रांची संख्या, त्याठिकाणी आवश्यक असलेल्या सोयीसुविधा आणि उपाययोजना, कायदा आणि सुव्यवस्था, प्रतिबंधात्मक कार्यवाही, मतदारांची जनजागृती आदी विषयावर मार्गदर्शन केले.

मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी मतदारांच्या रांगा लागतात. त्याची पुरेशी व्यवस्था व्हावी तसेच मतदारांची गैरसोय होणार नाही, याची पुरेशी दक्षता घ्यावी. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी स्वीपच्या माध्यमातून मतदारांना आवाहन करावे. निवडणूक विषयक यंत्रणेकडे आलेल्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करावे. सोशल मीडियाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या प्रचाराकडे लक्ष देण्याची सूचनाही त्यांनी केली.
यावेळी, विधानसभा मतदार संघासाठी नियुक्त निरीक्षक यांनीही विविध सूचना केल्या. जिल्हा निवडणूक अधिकारी श्री.शर्मा यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणेच्या तयारीची माहिती दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!