Homeउद्योगनाशिक शहरात रंगपंचमीच्या दिवशी दोन सख्या भावांचा निर्घृण खून, शहरात दहशतीचे वातावरण..

नाशिक शहरात रंगपंचमीच्या दिवशी दोन सख्या भावांचा निर्घृण खून, शहरात दहशतीचे वातावरण..

दोन सख्या भावांना त्यांच्या राहत्या घराच्या परिसरात दोघांवर धारधार शस्त्राने तोंडावर, मानीवर वार करून त्यांचा निर्घृण खून करण्यात आला आहे..

पोलीस वार्ता, नाशिक : रंगपंचमी सणाला गालबोट लावत शहरात खुनाचे सत्र हे सुरूच आहे, कायदा व सुव्यवस्था फक्त नावालाच उरली आहे की काय? नाशिकमधील गुन्हेगारी रोखण्यास पोलीस कुठे तरी अपयशी पडत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. नाशिक शहरात एक-दोन दिवसात एक तरी खुनाची घटना घडत असल्यामुळे हे स्पष्ट होते आहे. ऐन सणाच्या दिवशी देखील खुनांची मालिका थांबताना दिसत नाही. उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी, दि.19 मार्च 2025 रोजी रंगपंचमी सणाच्या दिवशी रात्री सुमारे 9:30 वाजेच्या दरम्यान शहरातील आंबेडकर वाडी, उपनगर भागात राहणारे प्रशांत जाधव व मन्ना (उमेश) जाधव या दोन सख्या भावांना त्यांच्या राहत्या घराच्या परिसरात दोघांवर धारधार शस्त्राने तोंडावर, मानीवर वार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, मन्ना (उमेश) जाधव हा राष्ट्रवादी शहरउपाध्यक्ष पदी कार्यरत होता, अज्ञात हल्लेखोर हे 3-4 किंवा या पेक्षा जास्त असतील त्यांनी पहिले प्रशांत जाधव याला एकटा पाहून हल्ला करत धारधार शस्त्राने त्याच्यावर वार केले त्यानंतर भावाला वाचवण्यासाठी गेलेल्या मन्ना (उमेश) जाधव हा येताच हल्लेखोर त्याच्यावर धावले आणि त्याला देखील गंभीर स्वरूपाचे वार करून जखमी केले. या घटनेत मन्ना याचा जागीच मृत्यू झाला होता व प्रशांत हा रुग्णालयात नेल्यावर मृत्युमुखी पडला. या दोन सख्या भावांचा एकाच घटनेत निर्घृण खून झाल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे,
पोलीसांना माहिती मिळताच, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे तसेच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत मॅडम, सहा. पोलीस आयुक्त डॉ.सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे या सर्वांनी घटनास्थळी पोहचून पाहणी केली व सदर मृतदेह नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला.
नाशिक जिल्हा रुग्णालयात मोठ्या संख्येने मृतकांचे नातेवाईक आणि मित्र परिवार गर्दी करून उपस्थित होते व हळहळ व्यक्त करत होते. पोलिसांनी लवकरात लवकर खुनाचा उलगडा करून अज्ञात मारेकऱ्यांना शोधून अटक करावी ही सर्वांची मागणी आहे. हल्लेखोरांच्या मागावर चार पोलीस पथके पाठवण्यात आले आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

१२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड; नागपुरातून तिघे आरोपी जेरबंद

0
१६.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई भुसावळ : भुसावळ शहरातील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातील...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद

0
व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्Paragraphया हल्ल्यानंतर तरुणाचा...

दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर तरुणाचा मृत्यू झाल्याच्या खळबळजनक प्रकरणात भुसावळ पोलिसांनी...

बोरखेडा हत्याकांड : ‘रेअरेस्ट ऑफ रेअर’ ठरवत फाशीची मागणी; शिक्षेचा निकाल आज

0
उज्वल निकम यांचा ४५ मिनिटांचा जोरदार युक्तिवाद; आरोपीकडून किमान शिक्षेची विनंती भुसावळ - रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे १५ ऑक्टोबर २०२० रोजी घडलेल्या चार निष्पाप भावंडांच्या...

error: Content is protected !!