Homeउद्योगमुक्ताईनगर पोलीसांनी दरोड्याच्या गुन्ह्याची उकल करत आरोपींना घेतले ताब्यात!

मुक्ताईनगर पोलीसांनी दरोड्याच्या गुन्ह्याची उकल करत आरोपींना घेतले ताब्यात!

गुन्ह्यात वापरलेले गावठी कट्टा, 4 मोबाईल फोन, एक बुलेट गाडी, तसेच हिस्कावलेले 10,000/- रु.रोख रक्कम असे गुन्ह्याची उकल करून रिकव्हरी केली आहे.

पोलीस वार्ता, मुक्ताईनगर | शहरातील प्रवर्तन चौकातील लक्ष्मीनारायण प्रोव्हिजन दुकानासमोर एक पानटपरी आहे. पानटपरी जवळच आरोपी यांने फिर्यादी पानटपरी चालक व साक्षीदार यांच्यावर चाकुने वार करुन फिर्यादीच्या हातातील एका पिवळ्या रंगांचे पिशवीतील 10,000/- रु. रोख रक्कम जबरदस्तीने हिसकवुन पळ काढला होता. त्यावरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दि.20-12-2024 रोजी चोरी आणि हल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हा घडलेल्या ठिकाणी पोलीसांनी भेट देवून तिथे मिळालेल्या भौतिक व तांत्रिक पुराव्या वरून सदर गुन्हा करतांना वापरलेली गुन्ह्याची पध्दत ही यापुर्वीचा रेकॉर्ड वरील संशयित आरोपी ‘प्रेम उर्फ गोपी’ अनिल धामणे, रा.वाल्मीक नगर, भुसावळ याची असल्याचा पोलीस तपासात संशय आला. यावरून त्याला ताब्यात घेवून विचारपूस केली असता, त्याने त्याच्या इतर साथीदार रोहीत उर्फ दादु संजय नवधीरे, रा.वाल्मीक नगर, भुसावळ, रिहान शहा करीम शहा, मिशन रफिक शेख, रा.जाममोहल्ला भुसावळ, कुंदन अनिल पठाळे, रा.भुसावळ यांच्या सोबत गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानुसार त्यांना ताब्यात घेवून त्यांच्या कडून गुन्ह्यात वापरलेले गावठी कट्टा, 4 मोबाईल फोन, एक बुलेट गाडी (एचएफ डिलेक्स), तसेच फिर्यादी कडून हिस्कावलेले 10,000/- रु.रोख रक्कम असे गुन्ह्याची उकल करून रिकव्हरी केली आहे. गुन्ह्यातील सर्व आरोपींना मुक्ताईनगर पोलीस ठाणे गु.रु.न 434/2024, भा.द.वी कलम 309 (6) शस्त्र अधि.1959 कलम 4/25 या गुन्ह्यात जमा करण्यात आले आहे. गुन्ह्यात वाढीव कलम लावून मा.न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना 6 दिवसांची पोलीस रिमांड कस्टडी दिली आहे. या गुन्ह्याचा तपास स.पो.नि श्री.चाटे, मुक्ताईनगर पो.ठाणे हे करीत आहेत.
या कारवाईसाठी पो.नि बवन आव्हाड स्थागुशा, पो.नि नागेश मोहीते, स.पो.नि राजेंद्र चाटे, स.पो.नि जयेश पाटील मुक्ताईनगर पोलीस स्टेशन, पो.उप.नि.श्री शरद बागल, पोह कमलाकर बागुल, गजानन देशमुख, गोपाल गव्हाळे, संघपाल तायडे, श्रीकृष्ण देशमुख, सचिन पोळ, महेश सोमवंशी सर्व नेम.स्थागुशा जळगाव तसेच पोना महेंद्र सुरवाडे, पोना सुरेश मेढे, पोकों गोविंदा पवार, सुनिल मोरे मुक्ताईनगर पो.ठा यांच्या पथकाने शोध घेऊन तपास पूर्ण केला.
यासाठी मार्गदर्शन लाभले मा.डॉ.श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, मा.श्री अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, मा.श्री. बबन आव्हाड, पोलीस निरीक्षक, स्थागुशा जळगाव यांचे मार्गदर्शनाखाल

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!