Homeउद्योगजिल्हाधिकारी विकास मिना यांची भालर येथे बैठक संपन्न, वेकोलि अधिकाऱ्यांना केल्या सूचना..

जिल्हाधिकारी विकास मिना यांची भालर येथे बैठक संपन्न, वेकोलि अधिकाऱ्यांना केल्या सूचना..

बैठकीत कोलार पिंपरी कोळसा खाण प्रकल्प, वेकोली-वणी क्षेत्र, वणी नॉर्थ प्रकल्प आदींसह विविध खाणींन संदर्भातील प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली..

पोलीस वार्ता, वणी : जिल्हाधिकारी विकास मिना यांची भालर येथील वेकोलि रेस्ट हाऊस येथे बुधवारी, दि.18 जून 2025 रोजी बैठक संपन्न झाली. यावेळी उकणी येथील उर्वरीत 10 टक्के जमिनीचे त्वरीत संपादन करून संपूर्ण पूनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी वेकोलि अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
बैठकीत कोलार पिंपरी कोळसा खाण प्रकल्प, वेकोली-वणी क्षेत्र, वणी नॉर्थ प्रकल्प आदींसह विविध खाणींसंदर्भातील प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीला खासदार प्रतिभा धानोरकर व वेकोलि अधिका-यांची प्रमुख उपस्थिती होती. उकणी या क्षेत्रातील 85 ते 90 टक्के जमीन वेकोलीने संपादित केली. परंतु उर्वरीत 600 एकर जमिनीचे अद्यापही संपादन झालेले नाही. या भूमीवर सुमारे 175 शेतकरी उदरनिर्वाह करतात. ही जमीन वेकोलीने संपादित न केल्याने या शेतकऱ्यांना ही जमीन सोडावी लागेल. बैठकीत वेकोलि सुरक्षा समितीचे सदस्य संजय खाडे यांनी हा प्रश्न उपस्थित केला.
जिल्हाधिकारी यांनी बैठकीत उकणी गावातील उर्वरित जमिनीचे त्वरित संपादन करण्याच्या सूचना दिल्या. खा.प्रतिभा धानोरकर यांनी वेकोलिसंबंधीत विविध प्रश्न आक्रमकपणे मांडले. वणी नॉर्थ कोलारपिंपरी ओपन कास्ट प्रकल्पासाठी अधिग्रहित जमिनींचा अद्याप मोबदला मिळालेला नाही. यावर या प्रकरणाची तातडीने चौकशी करून लवकरात लवकर मोबदला वितरित करण्याचे निर्देश ही जिल्हाधिकारी यावेळी यांनी दिले.
या बैठकीला उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार, तहसीलदार निखिल धुळधर, वेकोली वणीचे क्षेत्रीय महाप्रबंधक सुजित पिसारोडी, वणी नॉर्थचे क्षेत्रीय महाप्रबंधक एम.संजीवा रेड्डी यांच्यांसह उकणी येथील सुरेश ढपकस, अमोल पुरडकर, पराग तुराणकर, सचिन जुनारकर, सचिन लोडे, किसन पारशिवे, केशव ताजणे, माधवराव लेडांगे, मनोहर सातघरे, योगेश ताजने, दीपक खाडे, रविंद्र जोगी, उषा ठाकरे, गीता पिंगे, संतोष पिंगे, राजू ठाकरे, सतीश खाडे, प्रमोद वासेकर, राजू अंकतवार, तेजराज बोडे, प्रफुल्ल उपरे, जितेंद्र बोंडे यांच्यासह कोलारपिंपरी, ब्राम्हणी, अहेरी येथील नागरिक उपस्थित होते.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: नरेश ठाकरे, (वणी) यवतमाळ, संपर्क: 9588664532
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!