Homeक्राईमखडका रोडवरील ताज नगरात २२ किलो गांजा जप्त ; दोघांना अटक

खडका रोडवरील ताज नगरात २२ किलो गांजा जप्त ; दोघांना अटक

भुसावळ – (निलेश. के.फिरके) शहरातील खडका रोड परिसरातील ताज नगर भागात सुरू असलेल्या गांजा विक्रीच्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकत तब्बल २२ किलो गांजा जप्त केला. या कारवाईत सुमारे ४ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. जिल्हा पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केल्याने शहरातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
खडका रोडवरील ताज नगर भागात दोन इसम राहत्या घरातून गांजा विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती तात्काळ पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना दिल्यानंतर संबंधितांवर कारवाईचे आदेश देण्यात आले. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित तसेच भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनकडे रवाना झाले. पथकाने बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांची भेट घेऊन मिळालेल्या गोपनीय माहितीची माहिती दिली.
यानंतर पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी गुन्हे शोध पथकातील विजय नेरकर, कांतीलाल केदारे, चंद्रकांत रायपूरकर, योगेश माळी, भूषण चौधरी,सचिन चौधरी, जावेद शाह, प्रशांत सोनार, महेंद्र पाटील आणि अक्षय कोतकर यांना कारवाईसाठी पाचारण केले.
पथकाने ता. १५ रोजी सकाळी सुमारे १२ वाजेच्या सुमारास खडका रोडवरील ताज नगर येथे छापा टाकला. अजीज शेख मजिद व सलिम शेख मजिद यांच्या राहत्या घरांची झडती घेतली असता घरामध्ये २२ किलो गांजा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत सुमारे ४ लाख ३९ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी दोन्ही संशयितांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले असून गुन्हे शाखेचे उमकांत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डंपरच्या चाकाखाली चिरडून मजुराचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

0
भुसावळ - तालुक्यातील सुनसगाव येथे सुदर्शन पेपर अँड प्रॉडक्ट्ससमोर रेतीने भरलेल्या डंपरच्या चाकाखाली चिरडून एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ४ जून रोजी पहाटे...

उतुंग यश: पोलीस कर्मचाऱ्याच्या सुपुत्रांचा पोलीस अधिक्षकांकडून गौरव

0
:जळगाव - येथील  पोलीस दलात कार्यरत असलेले किशोर लक्ष्मण सोनटक्के यांचे सुपुत्र विकास किशोर सोनटक्के यांनी १२ वी विज्ञान (Science) शाखेच्या परीक्षेत ८०% गुण...

जामनेरमध्ये बेकायदेशीर HTBT कापूस बियाण्यांवर धाड ; ९.१५ लाखांचा साठा जप्त, चौघांविरुद्ध गुन्हा

0
जामनेर, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यात प्रतिबंधित व बेकायदेशीर HTBT (हर्बिसाइड टॉलरंट बीटी) कापूस बियाण्यांच्या साठवणूक व विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत जामनेर पोलिसांना मोठे...

मोर धरण परिसरातील शासकीय जमीन तात्काळ रिकामी करण्याचे आदेश

0
भुसावल - मोर धरणालगत हिंगोणे व बोरखेडा बुद्रुक ता .यावल परिसरातील शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे शेती करणाऱ्या अथवा ताबा घेतलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ जमीन रिकामी करावी,...

भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद

0
भुसावळ : येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली....

error: Content is protected !!