भुसावळ – शहरातील आयान कॉलनी भागातील रहिवाशी सुभान शेख व त्यांची पत्नी यांच्यामध्ये दुपारी कौटुंबिक वाद झाले व शेख यांची पत्नी दुपारी ही मामाकडे गेली.वडील व मामा हे जावाईची घरी समजूत काढण्यासाठी आले असता जावायाने मामा समद शेख इस्माईल कुरेशी यांच्यावर चाकूने वार केल्याने या घटनेत मृत्यू झाला आहे.तर वडिल शेख जमिल शेख शकुर यांना मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले आहे.या घटनेमुळे परीसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संशयित सुभान शेख यास ताब्यात घेतले. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी शेख जमिल शेख शकुर यांची रुग्णालयात भेट घेवून घटनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.

शुभान शेख यांचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांच्या पत्नी सोबत नेहमी त्यांचे कौटुंबिक वाद व्हायचे.वाद झाले की,ती माहेरी निघून जायची व परत यायची पुन्हा. ता.१२ रोजी दुपारी दोघे पती पत्नी मध्ये कौटुंबिक वाद झाले व ती मामाकडे गेली.जावाई यांची समजूत काढण्यासाठी मामा व वडील हे भुसावळला आहे. मात्र जावाई यांनी सासरे शेख जमिल शेख शकुर यांना मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले तर मामा समद शेख इस्माईल यांना चाकूने छातीवर वार केल्याने उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.सदरील घटनेमध्ये पोलिसांनी संशयित सुभान शेख यास ताब्यात घेतले.
सदरील घटनास्थळी माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित,पोलीस निरीक्षक राहुल वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षण राजू सांगळे, पोउप निरी.मंगेश जाधव तसेच गुन्हे शोध पथकाचे कर्मचाऱ्यांची धाव घेतली.




































