Homeक्राईमभुसावळ पोलीस ॲक्शन मोडवर ; सराईत गुन्हेगार ताब्यात !

भुसावळ पोलीस ॲक्शन मोडवर ; सराईत गुन्हेगार ताब्यात !

भुसावळ पोलीस उपविभाग व RPF ॲक्शन मोडमध्ये असून उपविभागात संयुक्त ‘कॉम्बिंग ऑपरेशन’ राबवून ६० हून अधिक संशयितांची झाडाझडती, सराईत गुन्हेगारांना घेतले ताब्यात आहे.

भुसावळ शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि रेल्वेच्या भंगार चोरीच्या गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी भुसावळ पोलीस उपविभागाच्या वतीने व RPF भुसावळ यांच्या संयुक्त कारवाईत संपूर्ण परिसर आणि उपविभागात धडक ‘कॉम्बिंग ऑपरेशन’ (Combing Operation) राबवण्यात आले. या धडक मोहिमेदरम्यान पोलिसांनी अनेक गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना ताब्यात घेतले असून अवैध शस्त्रे, चोरीचे साहित्य जप्त केले आहे.
सदर कोम्बींग ऑपरेशन दरम्यान पोलीस व RPF यांच्या संयुक्त पथकांनी खालील प्रमाणे कारवाया केल्या.

• ६० गुन्हेगारांची घरे व सुमारे १०० संशयितांची झाडाझडती घेतली .
• २५ ते ३० जण पोलिसांच्या ताब्यात ; NBW वॉरंटातील आरोपी , कोयता आणि चोरीच्या केबलसह कटर आरोपीतकडु जप्त .
• ५ पोलीस अधिकारी व ३५ अंमलदारांच्या पथकासह भुसावळ RPF ची मोठी कारवाई.

प्रमुख कारवाया

१. NBW वॉरंट मधील आरोपी जेरबंद:
रेल्वे पोलीस ठाण्यातील ३ Non-Bailable Warrants (NBW) ची कारवाई करण्यात आली त्यात सराईत आरोपी श्याम सुभाष शिरसाट उर्फ श्याम काल्या उर्फ अब्दुल गफूर यास यशस्वीपणे ताब्यात घेण्यात आले आहे.

२. अवैध कोयत्यासह आरोपी अटकेत:
पंचशील नगर परिसरातून शोहेब शाह शरीफ शाह याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला असून त्याच्यावर Arms Act 4/25 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. (सदर आरोपीला अटक करण्यात आली आहे).

३. प्रतिबंधात्मक कारवाई (BNS 128):
चोरीचे भंगार खरेदी करणारा शेख सरदार शेख बशीर याच्यावर BNSS 128 + 2 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

४. चोरीची केबल व कटर जप्त (दीपनगर परिसर):
म.पो.ॲक्ट १२४ (M.Po. Act 124) अंतर्गत कारवाई करत राजू सुरवाडे (रा. निंभोरा) याच्याकडून दीपनगर परिसरात चोरी केलेली सुमारे ५० किग्रॅ वजनाची केबल आणि कटर जप्त करण्यात आले आहे.

• घरांची झाडाझडती : रेकॉर्डवरील एकूण ६० आरोपींची घरांची झडती घेण्यात आली.
• शॉर्टलिस्ट केलेले संशयित : कारवाईदरम्यान एकूण १०० संशयित गुन्हेगारांची यादी (Shortlisted) तयार करून त्यांची कसून चौकशी करण्यात आली.
• मोहिमेदरम्यान २५ ते ३० संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
(एकूण ६० सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगारांची कसून तपासणी करण्यात आली).

तगडा पोलीस बंदोबस्त व पथक:

सदर कोम्बिंग ऑपरेशन हे मा.पोलीस अधिक्षक श्री.श्रीकांत धिवरे साहेब ,मा.अपर पोलीस अधिक्षक श्री.संदिप गावीत यांचे मार्गदर्शनाखाली भुसावळ पोलीस उपविभागातील डॅशिंग DySP श्री.केदार बारबोले भुसावळ उपविभागातील पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व अंमलदारांच्या तसेच RPF भुसावळ रेल्वे विभाग यांचे सहकार्याने पार पडले:

सदर कोम्बीग ऑपरेशन कारवाईमध्ये दोन प्रोबीशनरी DySP उपविभागीय पोलीस अधिकारी

पाच पोलीस अधिकारी (PI/API/PSI) यामध्ये भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.महेश गायकवाड, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.राहुल वाघ, भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री निलेश गायकवाड ,भुसावळ शवाशा चे सपोनि श्री. राहुल भंडारे ,बाजारपेठ पोलीस स्टेशनचे दुय्यम अधिकारी श्री राहुल तायडे असे होते.

पत्तीस पोलीस अंमलदार
(वेगवेगळ्या पथकांमध्ये १+१४, २+१०, १+११ याप्रमाणे नियोजनबद्ध रचना करण्यात आली होती).
o RPF (रेल्वे सुरक्षा बल) टीम : ३ PI (पोलीस निरीक्षक) + २३ कर्मचारी

• जळगांव येथील 3 आरसीपी (RCP) प्लाटून
“भुसावळ पोलीस उपविभाग परिसरातील गुन्हेगारीवर शून्य सहनशीलता (Zero Tolerance) धोरण राबवत असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारच्या धडक मोहिमा व कॉम्बिंग ऑपरेशन्स यापुढेही सातत्याने सुरुच राहतील. कायदा मोडणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

0
(भुसावळ लोहमार्ग पोलीस व आरपीएफची संयुक्त कारवाई; खंडव्याच्या प्रवाशाला ताब्यात घेतले) भुसावळ  (निलेश.के,फिरके). कर्नाटक एक्स्प्रेसमधून वाहतूक करण्यात येत असलेला ६० हजार २८० रुपये किमतीचा सुगंधित पानमसाला...

भुसावळात बोगस डॉक्टरवर कारवाई

0
जनसेवा क्लिनिकवर पोलिसांची छापा कारवाई ; विविध इंजेक्शन्ससह औषधसाठा जप्त भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील प्रीमियर हॉटेलसमोरील जनसेवा क्लिनिकमध्ये कोणतीही वैद्यकीय नोंदणी अथवा आवश्यक वैद्यकीय...

कराड उत्तरमध्ये महिलांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

0
बांधकाम कामगारांना साहित्य वाटप; महिलांना संसारोपयोगी वस्तूंचे वितरण कराड : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील विविध भागांतील महिलांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गटात) जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी...

अगस्त क्रांति दिवस

0
रमाकांत मोरे । अगस्त माह भारत के स्वतंत्रता इतिहास में एक विशेष महत्व रखता है। 9 अगस्त 1925 को उत्तरप्रदेश के प्रमुख शहर लखनऊ...

गायत्री परिवार बुरहानपुर द्वारा शताब्दी वर्ष के उपलक्ष्य में विशेष गोष्ठी सफलतापूर्वक संपन्न

0
​बुरहानपुर | परम वंदनीय माता जी एवं अखण्ड दीप के शताब्दी वर्ष के उपलक्ष्य में गायत्री परिवार बुरहानपुर द्वारा एक विशेष गोष्ठी का आयोजन...

error: Content is protected !!