आज भव्य स्वागतासह जाहीर सभा
नंदुरबार (अजीम हाश्मी) शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. आमदार झाल्यानंतर त्यांचे प्रथमच आज शनिवारी नंदुरबारात आगमन होणार असल्याने मिरवणूक काढून सुभाष चौकात नागरि सत्कार व शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त करण्यासाठी सभा होणार आहे.
शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी विधान परिषदेवर निवडून आले आहेत.कालच त्यांनी मुंबईत विधान परिषदेच्या सदसत्वाची शपथ घेतले. आज शनिवार दि.२२ रोजी सायंकाळी ५ वाजता त्यांचे धुळे चौफुलीवर स्वागत करण्यात येऊन मिरवणुक काढण्यात येईल. धुळे चौफुली,मोठा मारुती मंदिर,नाट्यमंदिर परिसर,अंधारे चौक, आमदार कार्यालया मार्गे मिरवणूक सुभाष चौकात येईल त्या ठिकाणी सायं ७ वाजता जाहीर सभा घेण्यात येईल. जाहीर सभेत आ.चंद्रकांत रघुवंशी,आ.आमश्या पाडवी यांच्या नागरी सत्कार होईल.
स्वागताचे बॅनर झळकले / कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
विधान परिषदेच्या आमदारकीची माळ चंद्रकांत रघुवंशींच्या गळ्यात पडल्याने असंख्य कार्यकर्ते व त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. गेल्या २ ते ३ दिवसांपासून त्यांच्या स्वागताची तयारी सुरू आहे. सोशल मीडियात देखील शुभेच्छांचे इमेजेस,पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.’डोल डोल डोल घुमू लागला, या नंदनगरीत ढोल घुमू लागला’, गाणं सोशल मीडियावर सर्वाधिक व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळाले.




































