Homeक्राईमभुसावळात माऊली प्लाझा प्रकरण तापले; अनधिकृत बांधकामाचा स्फोटक अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे

भुसावळात माऊली प्लाझा प्रकरण तापले; अनधिकृत बांधकामाचा स्फोटक अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे

संयुक्त पाहणीत धक्कादायक बाबी उघड – मंजूर नकाशापेक्षा जादा बांधकाम, मोजमापात मोठ्या तफावा

भुसावळ : (निलेश फिरके)  शहरातील जामनेर रोड परिसरातील सर्वे क्र.115/1/अ, प्लॉट क्रमांक 09 वरील वादग्रस्त माऊली प्लाझा इमारतीच्या अनधिकृत बांधकाम प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या संयुक्त पाहणीत धक्कादायक बाबी उघड झाल्यानंतर संबंधित अहवाल भुसावळ उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून पुढील कारवाईसाठी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे.

प्रत्यक्ष पाहणीदरम्यान मंजूर आराखड्यापेक्षा वेगळे व अतिरिक्त बांधकाम करण्यात आल्याचे प्राथमिक निरीक्षणात समोर आले आहे. विशेषतः बेसमेंटच्या लांबी-रुंदीमध्ये बदल, इमारतीच्या उंचीत वाढ तसेच इमारतीच्या विविध बाजूंनी करण्यात आलेले एक्स्टेंशन हे मंजूर नकाश्यापेक्षा वेगळे असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. यामुळे बांधकाम नियमांचे उल्लंघन झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
तसेच इमारतीच्या परिसरालगत उच्च दाबाची विद्युत वाहिनी (High Tension Line) जात असल्याची बाबही अहवालात अधोरेखित करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हा मुद्दा अत्यंत गंभीर मानला जात असून भविष्यात संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो, अशीही नोंद करण्यात आली आहे.याशिवाय मंजूर आराखड्यातील लिफ्ट डक्ट, पार्किंग व्यवस्था तसेच इतर तांत्रिक बाबींमध्ये प्रत्यक्ष स्थिती वेगळी असल्याचेही संयुक्त पाहणीत स्पष्ट झाल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, या प्रकरणाबाबत स्थानिक नागरिकांनी यापूर्वीच लेखी तक्रारी केल्या होत्या. पाहणी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविल्यानंतर आता या वादग्रस्त बांधकामावर प्रशासन कोणती कठोर कारवाई करणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. तसेच भुसावळातील इतर अनधिकृत बांधकामांवरही प्रशासन कारवाई करणार का, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तासवडे एमआयडीसी स्फोट प्रकरणाला नवे वळण ; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

0
सातारा (मीनाक्षी पोळ उंब्रज) : कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीतील भीषण स्फोट प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, अमोल सुभाष कांबळे यांच्या तक्रारीनंतर उच्चस्तरीय चौकशीचे...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांनी जारी केले शस्त्र व जमावबंदी आदेश!

सदरचे आदेश लग्नकार्य, मिरवणुका, तालुका आठवडे बाजार किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत.. पोलीस वार्ता, नाशिक : शहर परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी नाशिक...

“भीषण गर्मी में बच्चों के स्वास्थ्य को लेकर पालक महासंघ की पहल, कलेक्टर से...

0
“भीषण गर्मी में बच्चों के स्वास्थ्य को लेकर पालक महासंघ की पहल, कलेक्टर से समय परिवर्तन व अवकाश की मांग” बुरहानपुर। लगातार बढ़ती गर्मी को...

“नारी शक्ति वंदन” कार्यक्रम का नगर परिषद शाहपुर में आयोजन हुवा

0
नगर परिषद शाहपुर में माननीय मुख्यमंत्री जी की अध्यक्षता में रवींद्र भवन भोपाल में आयोजित राज्य स्तरीय "नारी शक्ति वंदन" कार्यक्रम का आयोजन मान....

सड़क दुर्घटना में घायल को डायल-112 की तत्परता से मिला नया जीवन

0
बुरहानपुर जिले में डायल-112 सेवा ने एक बार फिर अपनी तत्परता,संवेदनशीलता और कर्तव्यनिष्ठा का उत्कृष्ट उदाहरण प्रस्तुत करते हुए एक गंभीर रूप से घायल...

error: Content is protected !!