Homeआरोग्यनवेगाव येथे दिंडी-शोभा यात्रेसह हनुमान जन्मोत्सव आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामजयंती सोहळा...

नवेगाव येथे दिंडी-शोभा यात्रेसह हनुमान जन्मोत्सव आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामजयंती सोहळा उत्सवात संपन्न!

जयंती सोहळ्यानिमित्त दिंडीचे आणि शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते, वीरकुंड येथील तुकडोजी महाराज चौक येथून भजनाच्या गजरामध्ये दिंडीला सुरुवात झाली होती..

पोलीस वार्ता, वणी : आज भगवान हनुमान जयंती आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामजयंती निमित्त नवेगाव, वीरकुंड येथे आज दि.12 एप्रिल रोजी, सकाळी 7 वाजता दिंडीचे आणि शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. वीरकुंड येथील तुकडोजी महाराज चौक येथून भजनाच्या गजरामध्ये दिंडीला सुरुवात झाली होती. दु.1 वाजता ह.भ.प आवारी महाराज यांचा काल्याच्या किर्तनचा कार्यक्रम संपन्न झाला. 
या दिंडी सोहळ्यासाठी गावकऱ्यांनी चांगलेच परिश्रम घेतले होते. वणी तालुक्यातील हरिपाठ, वेगाव, डोंगरगाव, सोमनाडा तसेच नवेगाव यासह अनेक गावांचा सहभाग व सहकार्य यासाठी मिळाले. या हनुमान जन्मोत्सव व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामजयंती सोहळ्यानिमित्त श्री.निलेश चवले यांनी भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. तसेच अखिल भारतीय सेवा मंडळ, नवेगाव यांनी जयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

कार्यक्रम प्रसंगी आलेल्या मान्यवरांचे जयंती मंडळाने स्वागत केले. यावेळी बोलताना सौ.किरण ताई देरकर, वनी स्त्री-शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्ष म्हणाल्या, ज्यावेळी महिलांची प्रगती होईल तेव्हा राष्ट्राची प्रगती होईल, राष्ट्रसंतांची भजने, कीर्तने आपण म्हणावी त्याने आपल्यामध्ये त्यांच्या विचारांना वाव मिळेल आणि यातून आपल्या स्वतःची, गावाची, राष्ट्राची, समाजाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजाला शिक्षित करण्यासाठी अत्यंत कठीण परिश्रम घेतले आहे. त्यांच्या कार्याला उजाळा देत गावकऱ्यांना त्यांचे विचार सांगून सौ.किरण ताई देरकर यांची सर्वांचे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमसाठी सोहळ्यात वीरकुंड सरपंच सौ.वर्षाताई मडावी, श्री. मनोहर पाटील झाडे, विनूताई डांगे, उपसरपंच विरकुंड श्री. रामकृष्ण ताजने, गुरुदेव प्रचारक दिशा चवले, वीरकुंड पोलीस पाटील मीनाक्षी मोहिते, विद्याताई कालेकर, अशोक जोगी, विलास कालेकर आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: नरेश ठाकरे, (वणी) यवतमाळ, संपर्क: 9588664532
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डंपरच्या चाकाखाली चिरडून मजुराचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

0
भुसावळ - तालुक्यातील सुनसगाव येथे सुदर्शन पेपर अँड प्रॉडक्ट्ससमोर रेतीने भरलेल्या डंपरच्या चाकाखाली चिरडून एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ४ जून रोजी पहाटे...

उतुंग यश: पोलीस कर्मचाऱ्याच्या सुपुत्रांचा पोलीस अधिक्षकांकडून गौरव

0
:जळगाव - येथील  पोलीस दलात कार्यरत असलेले किशोर लक्ष्मण सोनटक्के यांचे सुपुत्र विकास किशोर सोनटक्के यांनी १२ वी विज्ञान (Science) शाखेच्या परीक्षेत ८०% गुण...

जामनेरमध्ये बेकायदेशीर HTBT कापूस बियाण्यांवर धाड ; ९.१५ लाखांचा साठा जप्त, चौघांविरुद्ध गुन्हा

0
जामनेर, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यात प्रतिबंधित व बेकायदेशीर HTBT (हर्बिसाइड टॉलरंट बीटी) कापूस बियाण्यांच्या साठवणूक व विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत जामनेर पोलिसांना मोठे...

मोर धरण परिसरातील शासकीय जमीन तात्काळ रिकामी करण्याचे आदेश

0
भुसावल - मोर धरणालगत हिंगोणे व बोरखेडा बुद्रुक ता .यावल परिसरातील शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे शेती करणाऱ्या अथवा ताबा घेतलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ जमीन रिकामी करावी,...

भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद

0
भुसावळ : येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली....

error: Content is protected !!