भुसावळ – शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील आठवडे बाजार परिसरातील शिवम इलेक्ट्रिलक्स व कस्तुरी मेन्स वेअर आणि साडीया ही दोघे दुकाने अनोळखी इसमांनी पहाटे साडेचार वाजेच्या दरम्यान फोडल्यांची घटना ता.२ रोजी घडली.या घटनेत व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली.याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
सदरील चोरीच्या घटनेत संशयितांनी दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश केला.यात शिवम इलेक्ट्रिलक्स दुकानातील पाच लाख ७० हजार असा ऐवज चोरी झाला आहे.यात रोकड व कॉपर असे साहित्य असल्याची दाट शक्यता आहे.तीन संशयित सी.सी.टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.याबाबत मनीष बलराम तलरेजा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसरी घटना मागील बाजूस आय.डी.बी.आय बँक शेजारील कस्तुरी मेन्स वेअर आणि साडीया मध्ये झाली.या दुकानातील सी.सी.टीव्ही कॅमेरे बंद असल्याने नेमके संशयित कोण आहेत? याचा शोध घेणे एकप्रकारे पोलिसांना समोर आवाहन निर्माण झाले आहे. गुन्ह्यातील संशयित इसमांनी चोरी करून रेल्वेने पळ काढल्याने पोलीस त्या दिशेने तपास करीत आहे.मात्र अद्यापावतो पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला नाही.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, पोलीस निरीक्षक राहुल वाघ, स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी तसेच गुन्हे शोध पथकातील कर्मचारी अशांनी भेट देवून माहिती जाणून घेतली.


























