Homeक्राईम१८ वर्षांपासून फरार असलेल्या सोनी इन्व्हेस्टमेंट घोटाळ्यातील आरोपीचा जामीन फेटाळला

१८ वर्षांपासून फरार असलेल्या सोनी इन्व्हेस्टमेंट घोटाळ्यातील आरोपीचा जामीन फेटाळला

गुंतवणुकीवर आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक; बाजारपेठ पोलिसांकडून तुषार शिंदे याला अटक

भुसावळ : सोनी इन्व्हेस्टमेंट कंपनीमार्फत लाखो रुपयांच्या गुंतवणुकीवर आकर्षक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी तब्बल १८ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपी तुषार विजय शिंदे याचा जामीन अर्ज भुसावळ येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायालयाने २८ ऑगस्ट रोजी हा निर्णय दिला.
भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९३/२००७ अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी वर्षा मकरंद चौधरी यांना आरोपीने सोनी इन्व्हेस्टमेंटच्या योजनेत तीन लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा मिळेल, असे आमिष दाखविल्याचा आरोप आहे. त्यानंतर गुंतविलेली रक्कम तसेच अपेक्षित परतावा न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी तुषार शिंदे हा पोलिसांना तब्बल १८ वर्षे गुंगारा देत फरार होता. बाजारपेठ पोलिसांनी शोध घेऊन अखेर त्याला अटक केली. १९ ऑगस्ट २०२६ रोजी त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर २१ ऑगस्ट रोजी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
दरम्यान, आरोपीच्या वतीने जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. या अर्जाला मूळ फिर्यादीच्या वतीने अॅड. विनोद तायडे यांनी, तर सरकारच्या वतीने सरकारी वकील पावरा यांनी जोरदार विरोध केला. आरोपी दीर्घकाळ फरार राहिल्याने त्याच्याकडून पुराव्यांमध्ये छेडछाड होण्याची अथवा पुन्हा फरार होण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद करण्यात आला.

अॅड. तायडे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या संबंधित न्यायनिर्णयाचा आधार घेत गुन्ह्याचे गांभीर्य आणि आरोपीचा प्रदीर्घ काळ फरार राहण्याचा इतिहास न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एम. बगे यांनी २८ ऑगस्ट रोजी आरोपी तुषार विजय शिंदे याचा जामीन अर्ज फेटाळला.

या निर्णयामुळे दीर्घकाळ कायद्याच्या प्रक्रियेपासून दूर राहिलेल्या आरोपीला जामीन मिळू नये, यासाठी फिर्यादी पक्षाने घेतलेल्या कायदेशीर भूमिकेला यश मिळाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रिपब्लिकन पक्षाच्या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड, अज्ञाताविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

0
अज्ञात समाजकंटकाने या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड करून बाकड्याची पारंपरिक ओळख पुसण्याचा मिश्किल प्रयत्न केला.. पोलीस वार्ता, देवळाली | कॅम्प येथील मध्यवर्ती बसस्थानक येथे 40 वर्षांपूर्वी...

हुडको कॉलनीतील नाल्यात अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

0
भुसावळ : शहरातील हुडको कॉलनी परिसरातील रानातले महादेव मंदिराजवळील नाल्यात एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे वय...

जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा

0
जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा रजनी सावकारे यांच्या हस्ते शिवपिंडीचे पूजन; भाविकांची उपस्थिती भुसावळ : शहरातील स्टेशन रोड परिसरातील हितवर्धिनी सोसायटीसमोरील जागृती श्री हनुमान...

गणपती मिरवणुकीत अल्पवयीन मुलीला मारहाण; न्हावीत काही काळ तणाव

0
न्हावी, ता. यावल : गणपती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी महादेववाडा परिसरात उभ्या असलेल्या १६ वर्षीय मुलीला युवकाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री घडल्याची माहिती...

सोमेश्वर महाराजांच्या आगमनाने रामायण नगरात भक्तिमय वातावरण

0
हॉटेल राधाकृष्णपासून ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक; ‘महाकाल’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला भुसावळ : उज्जैन येथील सोमेश्वर महाराजांचे भुसावळ शहरातील रामायण नगर परिसरात आगमन झाले. महाराजांच्या आगमनानिमित्त...

error: Content is protected !!