Homeउद्योगअग्निशस्त्र जवळ बाळगुन दहशत माजविणारा अटकेत नाशिक शहर गुन्हेशाखा युनिट-2 ची कामगीरी!

अग्निशस्त्र जवळ बाळगुन दहशत माजविणारा अटकेत नाशिक शहर गुन्हेशाखा युनिट-2 ची कामगीरी!

संजिवनगर, चुंचाळेशिवार येथे सापळा लावून बातमी प्रमाणे खात्री केली असता सदर ठिकाणी एक जण संशयास्पद फिरताना आढळून आला..

पोलीस वार्ता, नाशिक : शहरात वाढणारी गुन्हेगारी आणि अवैद्य धंदे यांवर कठोर कारवाईसाठी सुचना नाशिक शहर पोलीस आयुक्तांकडून देण्यात आल्या आहेत.
याच कारवाईच्या अनुषंगाने दि.3 मार्च 2025 रोजी गुन्हे शाखा युनिट-2 पथक चुंचाळे शिवार या परिसरात प्रतिबंधात्मक गस्त करीत असतांना पोह. मनोहर शिंदे व पोअं. महेश खांडबहाले यांना गोपनिय बातमी मिळाली की, संशयित मेहबुब मुमताज खान हा संजिवनगर, इंडियन पेट्रोलपंप मागे, चुंचाळे शिवार, नाशिक येथे विनापरवाना घातक अग्नीशस्त्र(बंदुक) बाळगुन फिरत आहे.
मिळालेली माहिती शहर गुन्हे शाखा युनिट-2 सहा.पोनि हेमंत तोडकर यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाने श्रेपोउनि. यशवंत बेंडकोळी, सपोउनि. गुलाब सोनार, पोह. मनोहर शिंदे, सुनिल आहेर, पोअं प्रविण वानखेडे, सुनिल खैरनार पथक तयार करून संजिवनगर, चुंचाळेशिवार येथे सापळा लावला आणि बातमी प्रमाणे खात्री केली असता सदर ठिकाणी मेहबुब खान हा संशयास्पद फिरताना आढळून आला. त्याला जागीच पकडून त्याचे नाव-गांव विचारता मेहबुब मुमताज अहमदखान (वय-23) रा. प्लॉट नं-66 गट नं-11, विराटनगर, अंबड लिंकरोड, चुंचाळेशिवार, नाशिक, असे सांगितले. त्याच्या कडून अंगझडतीत एक लोखंडी पिस्तुल व एक जिवंत काडतुस असा एकुण 30,500/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरूध्द पोअं. महेश खांडबहाले यांनी भा.ह.का. कलम 3/25 व म.पो.का.कलम 135 प्रमाणे अंबड पोलीस ठाणे येथे फिर्याद देवुन गुन्हा दाखल केला आहे. पुढील कारवाईसाठी आरोपीस अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री.संदिप कर्णिक साहेब, मा.पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री.प्रशांत बच्छाव, मा.सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री.संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक पोलीस गुन्हेशाखा युनिट-2 कडून करण्यात आली. पथकात सपोनि. डॉ.समाधान हिरे, प्रकाश महाजन, वाल्मीक चव्हाण यांचा देखील समावेश होता.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: गौतम जाधव, नाशिक, संपर्क: 9922838959
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी तपास वेगात; आरोपींकडून घटनास्थळी पुनर्रचना, उर्वरित तिघांचा शोध सुरू

0
भुसावळ शहरातील व्हीआयपी कॉलनीतील तरुणाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून महत्त्वाची माहिती मिळविण्यासाठी घटनास्थळी पुनर्रचना केली. गुरुवारी रात्री...

बोरखेडा हत्याकांडातील आरोपीला दुहेरी फाशी

0
१०४ पानी निकालात आरोपीच्या क्रौर्यावर न्यायालयाचे ताशेरे; भुसावळ सत्र न्यायालयाच्या इतिहासातील पहिली फाशीची शिक्षा भुसावळ : राज्यभरात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या बोरखेडा येथील चार निष्पाप भावंडांच्या...

१२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड; नागपुरातून तिघे आरोपी जेरबंद

0
१६.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई भुसावळ : भुसावळ शहरातील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातील...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद

0
व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्Paragraphया हल्ल्यानंतर तरुणाचा...

error: Content is protected !!