Homeक्राईमसदगुरू हॉस्पिटलमध्ये तरुणाचा मृत्यू; निष्काळाचीपणाचा आरोप करत कुटुंबीय बसले उपोषणाला!

सदगुरू हॉस्पिटलमध्ये तरुणाचा मृत्यू; निष्काळाचीपणाचा आरोप करत कुटुंबीय बसले उपोषणाला!

बेग कुटुंबीय दुःखी अंतःकरणाने उपोषणाला बसले कुटुंबात आई, पत्नी, चिमुकला मुलगा, नातेवाईक यांचा समावेश..

पोलीस वार्ता, नाशिक | शहरातील सदगुरू हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत आपल्या मृत्य भावाला न्याय मिळवून देण्यासाठी त्याचे कुटुंबीय अनुप अनिल बेग यांनी दि.29 सप्टेंबर 2026, दुपारी 12 वाजल्यापासून नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. संपूर्ण कुटुंबीय व समर्थकांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या या आंदोलनाने सदगुरू हॉस्पिटलच्या निष्काळजीपणावर लक्ष वेधले आहे.
नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर मंडप बांधून मृत्यू पावलेल्या स्व. निखिल बेग यांच्या प्रतिमेला समोर ठेवून त्याभोवती बेग कुटुंबीय दुःखी अंतःकरणाने उपोषणाला बसले आहेत. कुटुंबात आई, पत्नी, चिमुकला मुलगा आणि इतर नातेवाईक यांचा समावेश असून सर्व लोकशाही मार्गाने शांतपणे आपल्या न्याय हक्कासाठी मंडपात बसले आहेत. मंडपामध्ये लावलेल्या बॅनरवर “सदगुरू हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला, त्यास जबाबदार डॉक्टर व स्टाफ यांना शिक्षा व्हावी, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून हॉस्पिटल कायमचे बंद करावे” असा ठळक मजकूर लिहिलेला आहे. तसेच हॉस्पिटलची संबंधित काळातील सीसीटीव्ही फुटेजची प्रत मिळावी आणि चौकशी करून मृत निखिल बेग याची पत्नी आणि मुलाला न्याय मिळावा. अशा मागण्या बॅनरवर नमूद केल्या आहे.

उपोषणकर्ते अनुप बेग यांनी उपोषणापूर्वी दिलेल्या निवेदनात, भावाच्या मृत्यूची चौकशी वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली व्हावी, संबंधित सीसीटीव्ही फुटेज तात्काळ जतन करून द्यावे, शासनाने विशेष सरकारी वकील नेमावा तसेच आपल्याला व साक्षीदारांना संरक्षण मिळावे, अशा मागण्या निवेदनात केल्या आहेत. दोषी डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई होईपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

या आमरण उपोषणाला ‘हॉस्पिटल ठीक करो’ संस्थेचे संस्थापक यश गौरखेडे, सीजेपी (कॉक्रोच जनता पार्टी), राष्ट्रीय श्रीराम संघ, नाशिक महानगरपालिका संघर्ष समिती तसेच याच हॉस्पिटलमध्ये नातेवाईक गमावलेल्या इतर पीडित कुटुंबीयांचा पाठिंबा मिळत असून, समर्थकांची संख्या येत्या दिवसात वाढण्याची शक्यता आहे. उपोषणस्थळी सामाजिक कार्यकर्ते, नातेवाईक व नागरिकांची सतत ये-जा सुरू असून, प्रशासनाने त्वरित उपोषणाची दखल घेऊन या उपोषणकर्त्यांना संपर्क करून भेट घ्यावी. हीच अपेक्षा आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जळगावमध्ये ६४ ग्रॅम एमडीसह आरोपी जेरबंद

0
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; २ लाख १३ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त जळगाव : नशामुक्त भारत अभियानांतर्गत अवैध अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक व सेवनाविरोधात सुरू...

रिक्षेत बसवून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविली; तिघे ताब्यात

0
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; सोन्याचे मंगळसूत्र व रिक्षासह १ लाख २५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत भुसावळ : बाजार करून पायी घरी जाणाऱ्या महिलेला रिक्षेत बसवून तिच्या...

निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनचा पाचवा वर्धापन दिन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न!

समाजात उल्लेखनीय, सामाजिक कार्य करणाऱ्यांचे निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनच्या वतीने पुरस्कार.. पोलीस वार्ता, नाशिक | निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशन, रोखठोक पोलीस टाईम्स, निर्भिड ज्योत न्यूज...

फसवणुकीतील एक लाख रुपये परत मिळवून दिल्याबद्दल पोलिस कर्मचाऱ्याचा सत्कार

0
भुसावळ : फसवणुकीच्या प्रकरणात तक्रारदाराला त्याचे एक लाख रुपये परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल डीबी पथकातील कर्मचारी चंद्रकांत रायपूरकर यांचा तक्रारदार सलीम हबीब पटेल...

कृषि विज्ञान केंद्र में 81 विद्यार्थियों ने किया शैक्षणिक भ्रमण

0
कृषि विज्ञान केंद्र बुरहानपूर में 81 विद्यार्थियों ने किया शैक्षणिक भ्रमण रमाकांत मोरे वैज्ञानिकों ने विद्यार्थियों को फसल, कीट-रोग प्रबंधन एवं कृषि तकनीकों की जानकारी दी।...

error: Content is protected !!