Homeक्राईमजळगावामध्ये अंमली पदार्थांवर पोलिसांनी कारवाई; 11 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

जळगावामध्ये अंमली पदार्थांवर पोलिसांनी कारवाई; 11 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

1 किलो 963 ग्रॅम इफेड्रीन अंमली पदार्थ व 2 किलो 114 ग्रॅम गांजा जळगाव पोलिसांनी केला हस्तगत..

पोलीस वार्ता, जळगाव | अंमली पदार्थांची तस्करी व विक्रीला आळा घालण्यासाठी जळगाव स्थानिक पोलीस गुन्हे शाखा (LCB) आणि एमआयडीसी पोलिसांच्या संयुक्त पथकाने कारवाई करत तब्बल 11 लाख 17 हजार 200 रुपयांचा अंमली पदार्थांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात इफेड्रीन व गांजासह एक सुझुकी बर्गमन दुचाकीचा समावेश आहे. या कारवाईत एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील नारायणवाला बाबा दर्ग्यासमोरील रोडवर इफेड्रीन या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी संशयित येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित आरोपी नूर मोहम्मद अब्दुल सलाम पटेल, वय-55 वर्षे, रा. रामनगर, मेहरूण, जळगाव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील दुचाकी झडती घेतली असता डिक्कीत अंमली पदार्थ आढळून आले.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत 9 लाख 81 हजार 500 रुपये किंमतीचे 1 किलो 963 ग्रॅम इफेड्रीन पावडर, 1 लाख 5 हजार 700 रुपये किंमतीचा 2 किलो 114 ग्रॅम गांजा आणि 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्राथमिक फॉरेन्सिक तपासणीत जप्त पदार्थ इफेड्रीन व गांजा असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गु.र.क्र. 0704/2026 अन्वये एनडीपीएस कायदा 1985 मधील कलम 9(अ), 25(अ), 8(क) सह 20(ब)(ii) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणि पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सदर कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित व उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापूरे यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व त्यांच्या पोलीस पथकाने मिळून केली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महावितरणाकडून भगूर येथे ‘राष्ट्रीय अभियंता दिन’ निमित्त विजेची सुरक्षा व हरित ऊर्जा यावर प्रबोधन...

0
विजेच्या गरजेबाबत शिक्षक व मुलांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी. म्हणून कार्यक्रम राबविण्यात आला.. पोलीस वार्ता, देवळाली | 2026 'राष्ट्रीय अभियंता दिन' निमित्त महावितरण भगूर कक्षाकडून वीज...

भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात बाप्पाची स्थापना; एकतेचा संदेश

0
भुसावळ : येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलिस आणि नागरिकांमधील सलोखा व संवाद अधिक दृढ करण्यासाठी पोलिस ठाण्यात...

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

error: Content is protected !!