Homeक्राईमजळगावमध्ये ६४ ग्रॅम एमडीसह आरोपी जेरबंद

जळगावमध्ये ६४ ग्रॅम एमडीसह आरोपी जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; २ लाख १३ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त

जळगाव : नशामुक्त भारत अभियानांतर्गत अवैध अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक व सेवनाविरोधात सुरू असलेल्या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेने ६४.४४ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) अंमली पदार्थासह एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले. या कारवाईत एमडीसह मोबाईल फोन असा एकूण २ लाख १३ हजार ३२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नशामुक्त भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक व सेवनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गोपनीय माहिती संकलित करून प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी अधिकारी व अंमलदारांना अंमली पदार्थांबाबत अधिकाधिक माहिती संकलित करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

दरम्यान, पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, जळगाव तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील पाळधी-तरसोद बायपासलगत कचरा फॅक्टरी परिसरात अजय बिरजू गारुंगे (रा. तांबापुरा कंजरवाडा, मेहरुण, जळगाव) हा एमडी अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बाळगून आहे.

या माहितीची पडताळणी करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे २.२० वाजता कचरा फॅक्टरीजवळ सापळा रचला. यावेळी अजय बिरजू गारुंगे याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ६४.४४ ग्रॅम वजनाचा एमडी अंमली पदार्थ, अंदाजे किंमत १ लाख ९३ हजार ३२० रुपये, तसेच २० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन, असा एकूण २ लाख १३ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २९५/२०२६, एनडीपीएस कायदा कलम ८(क), २२(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपीशी संबंधित आणखी दोन संशयित अथवा साक्षीदारांचा शोध स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

आरोपीविरुद्ध यापूर्वी ३५ गुन्हे

पोलिसांच्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेल्या अजय बिरजू गारुंगे याच्याविरुद्ध यापूर्वी एमडी अंमली पदार्थ बाळगणे व विक्री करणे, गांजा बाळगणे व विक्री करणे, तसेच घरफोडी अशा गंभीर स्वरूपाचे एकूण ३५ गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

या पथकात पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील, पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलिस उपनिरीक्षक विजय देवराम पाटील, सफौ अतुल वजांरी, पोहेकॉ अकरम शेख, किशोर पाटील, प्रविण भालेराव, मुरलीधर धनगर, तसेच पोकों रविंद्र कापडणे, गोपाळ पाटील, प्रदीप सपकाळे, राहुल रगडे, छगन तायडे यांचा समावेश होता. तांत्रिक मदत पोकों मिलीद जाधव व गौरव पाटील यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रिक्षेत बसवून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविली; तिघे ताब्यात

0
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; सोन्याचे मंगळसूत्र व रिक्षासह १ लाख २५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत भुसावळ : बाजार करून पायी घरी जाणाऱ्या महिलेला रिक्षेत बसवून तिच्या...

सदगुरू हॉस्पिटलमध्ये तरुणाचा मृत्यू; निष्काळाचीपणाचा आरोप करत कुटुंबीय बसले उपोषणाला!

बेग कुटुंबीय दुःखी अंतःकरणाने उपोषणाला बसले कुटुंबात आई, पत्नी, चिमुकला मुलगा, नातेवाईक यांचा समावेश.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरातील सदगुरू हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे एका तरुणाचा मृत्यू...

निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनचा पाचवा वर्धापन दिन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न!

समाजात उल्लेखनीय, सामाजिक कार्य करणाऱ्यांचे निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनच्या वतीने पुरस्कार.. पोलीस वार्ता, नाशिक | निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशन, रोखठोक पोलीस टाईम्स, निर्भिड ज्योत न्यूज...

फसवणुकीतील एक लाख रुपये परत मिळवून दिल्याबद्दल पोलिस कर्मचाऱ्याचा सत्कार

0
भुसावळ : फसवणुकीच्या प्रकरणात तक्रारदाराला त्याचे एक लाख रुपये परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल डीबी पथकातील कर्मचारी चंद्रकांत रायपूरकर यांचा तक्रारदार सलीम हबीब पटेल...

कृषि विज्ञान केंद्र में 81 विद्यार्थियों ने किया शैक्षणिक भ्रमण

0
कृषि विज्ञान केंद्र बुरहानपूर में 81 विद्यार्थियों ने किया शैक्षणिक भ्रमण रमाकांत मोरे वैज्ञानिकों ने विद्यार्थियों को फसल, कीट-रोग प्रबंधन एवं कृषि तकनीकों की जानकारी दी।...

error: Content is protected !!