Homeताज्या बातम्यामहावितरणाकडून भगूर येथे 'राष्ट्रीय अभियंता दिन' निमित्त विजेची सुरक्षा व हरित ऊर्जा...

महावितरणाकडून भगूर येथे ‘राष्ट्रीय अभियंता दिन’ निमित्त विजेची सुरक्षा व हरित ऊर्जा यावर प्रबोधन कार्यक्रम संपन्न!

विजेच्या गरजेबाबत शिक्षक व मुलांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी. म्हणून कार्यक्रम राबविण्यात आला..

पोलीस वार्ता, देवळाली | 2026 ‘राष्ट्रीय अभियंता दिन’ निमित्त महावितरण भगूर कक्षाकडून वीज सुरक्षा, हरित ऊर्जा, विज चोरी याविषयांवर समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन दि.15 सप्टेंबर, मंगळवार रोजी करण्यात आले होते. याबाबत अधिक माहिती देताना भगूर कक्षाचे सहा. अभियंता सुरेश पाचंगे यांनी सांगीतले की, पहिल्यांदाच थेट शाळेत आणि नगरपरिषदेत जाऊन अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ‘अभियंता दिन’ आणि ‘गणेशोत्सवाचे’ औचीत्य साधुन काळाच्या बदल्या परिस्थिती नुसार आज अन्न, वस्त्र, निवारा नंतर अत्यंत आवश्यक अशा विजेच्या गरजेबाबत शिक्षक व मुलांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी. म्हणून कार्यक्रम राबविण्यात आला.

आगामी नव्या पिढीला विजेच्या आधुनिक स्वरूपावर सोलर, पवन आणि इलेक्ट्रिक वाहन तसेच वीज सुरक्षा आणि हरित ऊर्जा या बाबत आणि विजेचे उपकरणे हाताळतांना घ्यावयाची काळजी व उपयोजना, सुरक्षेविषयी माहिती सहा. अभियंता पाचंगे यांनी दिली. त्यानंतर महावितरणकडून विद्यार्थ्यांनी विजे बाबत ठेवलेल्या प्रश्न-उत्तर मंजुषेत छोट्या-छोट्या भेटवस्तू जिंकल्या. कार्यक्रमानंतर विजेच्या सुरक्षेवर उपस्थित सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांनी शपथ घेतली.

तसेच भगुर नगरपालिका इथे नगराध्यक्षांची भेट घेऊन भगूर शहरातील समस्या आणि महावितरणाकडून होणाऱ्या उपाययोजना याबाबत नगरसेवक विशाल बलकवडे यांचेशी सविस्तर चर्चा करून नगरपरिषदेत महावितरणाचे “हे करा, हे करु नका” या आशयाचे ‘सुरक्षा बॅनर’ लावून नगरपरिषदेत देखील ‘वीज’ बाबत प्रबोधन करण्यात आले. लवकरच देवळाली कॅम्प परिसरात वीज बाबत तक्रार दरबार भरवण्याचे देखील पाचंगे यांनी सांगितले. नगरसेवक विशाल बलकवडे यांनी भगूर शहरात विजेच्या प्रवाहात सुधारणाबाबत समाधान व्यक्त केले आहे. भगूर नगरपरिषद महावितरणासोबत असून शहर भूमिगत करण्याबाबत वीज मंडळाकडे त्यांनी विनंती केली आहे.

लोक सेवेचा व लोक कल्याणाचा आणि विजेच्या बाबतीत प्रबोधन या उद्देशाने भगूर महावितरण कक्षाकडून ‘अभियंता दिन’ साजरा झाला. या कार्यक्रमासाठी मुख्य अभियंता सुरेश लटपटे, अधीक्षक अभियंता अनिल थोरात, कार्यकारी अभियंता जगदिश जाधव यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच विज वितरणाचे भगूर-कॅम्प परिसरातील कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुलिस अधिकारी एवं कर्मचारियों का किया सन्मान

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) उड़ान लिनेस क्लब ग्रुप ऑफ़ बुरहानपुर सहेली द्वारा क्लब की फाउंडर और संपादक लिनेस रफत आसिफ खान के नेतृत्व में गुरुवार दोपहर...

नियम ताक पर रखकर सीलबंद अस्पताल को बिना सुधार के पुनः संचालन की अनुमति...

0
आयुष्मान घोटाले और प्रशासनिक सांठगांठ की निष्पक्ष जांच की मांग रमाकांत मोरे ‌ बुरहानपुर: अमरावती रोड स्थित चर्चित गुड अस्पताल को लेकर एक बार फिर प्रशासन और...

ग्राम पंचायत पीपरी बोरवन में ग्राम सभा जन-जागरूकता रैली आयोजित

0
खकनार पीपरी बोरवन - आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रम (भारत) की ओर से आज ग्राम पीपरी में ग्राम सभा जन-जागरूकता रैली का आयोजन किया...

सफाई कामगारांच्या प्रश्नांवर भुसावळ नगर परिषदेत विशेष आढावा बैठक

0
भुसावळ : नगर परिषदेतील सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सोनू सारवान यांच्या उपस्थितीत विशेष आढावा बैठक घेण्यात...

अमरदीप चौकातून बेपत्ता सहा वर्षीय बालकाचा लिफ्टच्या खड्ड्यात मृतदेह

0
सकाळपासून शोध सुरू असलेल्या अदनान खानचा रात्री मृतदेह आढळला; बांधकामस्थळी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर भुसावळ  : (निलेश फिरके) अमरदीप चौक परिसरातून बुधवारी सकाळपासून बेपत्ता असलेल्या सहा...

error: Content is protected !!