Homeआरोग्यदेवळाली मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान संपन्न!

देवळाली मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान संपन्न!

शिबिराचे आयोजन 14 मार्च 2026 रोजी गुरूकृपा लॉन्स, विहितगाव, नाशिक येथे अप्पर तहसील कार्यालय, नाशिक यांच्या वतीने करण्यात आले होते..

पोलीस वार्ता, नाशिक : देवळाली मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानाचा पहिला टप्पा अंतर्गत समाधान शिबिर उत्साहात संपन्न झाला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या या लोकाभिमुख उपक्रमांतर्गत नागरिकांच्या प्रशासकीय अडचणी सोडवून त्यांना विविध शासकीय सेवा त्यांच्या दारी ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न करण्यात येत आहे.

या शिबिराचे आयोजन 14 मार्च 2026 रोजी गुरूकृपा लॉन्स, विहितगाव, नाशिक येथे अप्पर तहसील कार्यालय, नाशिक यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली, अप्पर तहसीलदार अमोल निकम यांच्या संकल्पनेतून विकसित करण्यात आलेल्या चॅटबॉटविषयी माहिती देण्यात आली. पुढे क्यूआर कोडच्या माध्यमातून महसूल विभागाशी संबंधित दहा विविध सेवांची माहिती नागरिकांना घरबसल्या मोबाईलवर मिळू शकते, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही शेतकरी, खातेदार आणि विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले.
शिबिरात परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. विविध शासकीय प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी 350 दाखले तयार करण्यात आले असून त्यापैकी काही विद्यार्थ्यांना निवासी प्रमाणपत्रांचे प्रातिनिधिक वितरण करण्यात आले. याशिवाय 43 ज्येष्ठ नागरिकांना ओळख प्रमाणपत्र देण्यात आले. सातबारा उताऱ्यांवरील संगणकीय दुरुस्त्या तसेच प्रलंबित फेरफारांची नोंद पूर्ण करून सुधारित उताऱ्यांचे वाटप करण्यात आले. 67 खातेदारांच्या सातबारा उताऱ्यांमध्ये तात्काळ दुरुस्ती करण्यात आल्याने अर्जदारांनी समाधान व्यक्त केले. आधारकार्डातील त्रुटी दुरुस्त करण्याचीही कार्यवाही करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्राम महसूल अधिकारी यादव बच्छाव यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक मनपा नगरसेवक केशव पोरजे होते. यावेळी नगरसेवक योगेश गाडेकर, योगेश भोर, राहुल दिवे, संजीवनी हांडोरे, भारती ताजनपुरे, ज्योती जोंधळे, संजीव हांडोरे, विक्रम कोठुळे उपस्थित होते. तसेच अधिकारी तहसीलदार अमोल निकम, दुय्यम निबंधक पवार आणि भूमी अभिलेख विभागाचे नितनवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी देवळाली मंडळ अधिकारी तसेच मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले. शासनाचा ‘सेवा नागरिकांच्या दारी’ हा संकल्प प्रत्यक्षात उतरत असल्याचे समाधान यावेळी उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळात नगराध्यक्षांवर आरोप-प्रत्यारोप; प्रकरण न्यायप्रविष्ठ

0
भुसावळ : शहराच्या राजकीय वर्तुळात सध्या नगराध्यक्ष पदावरून आरोप-प्रत्यारोपांचा वाद चांगलाच तापला असून, लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री गौर भंगाळे यांनी आपल्याविरोधात खोटी माहिती पसरवली जात...

भुसावळ उपविभागातील लोक अदालतीत १०७ खटले निकाली ; ७७ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल

0
भुसावळ - जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली आज शनिवार, दिनांक ९ मे २०२६ रोजी 'लोक अदालतीचे' यशस्वी आयोजन करण्यात आले. या लोक अदालतीमध्ये भुसावळ...

भुसावळ भाजपा तर्फे वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहात साजरी

0
भुसावळ : क्रांतीसूर्य, वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी भुसावळ शहराच्या वतीने वसंत टॉकीज जवळील महाराणा प्रताप चौक येथे अभिवादन कार्यक्रम...

शाहपुर में दूषित पेयजल को लेकर कांग्रेस पदाधिकारियों का आक्रोश….

0
रविंद्र महाजन के निर्देश पर नगर कांग्रेस कमेटी शाहपुर ने सौंपा ज्ञापन, स्वच्छ पेयजल एवं यात्री प्रतीक्षालय की मांग शाहपुर, बुरहानपुर। नगर परिषद क्षेत्र में...

ब्लैक स्पॉट पर बुरहानपुर पुलिस की सख्त कार्रवाई, 42 वाहन चालकों से ₹24,800 वसूले

0
बुरहानपुर -: सड़क दुर्घटनाओं में कमी लाने के उद्देश्य से बुरहानपुर पुलिस द्वारा विशेष यातायात चेकिंग अभियान चलाया गया। यह अभियान इंदौर-इच्छापुर हाईवे के...

error: Content is protected !!