Homeक्राईमसोनल वाईन्समध्ये घरफोडी; अज्ञात चोरट्याने १.४८ लाखांची रोकड लंपास

सोनल वाईन्समध्ये घरफोडी; अज्ञात चोरट्याने १.४८ लाखांची रोकड लंपास

राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू

भोर / पुणे : (संतोष भोर) राजगड पोलीस ठाणे हद्दीतील खेड शिवापूर (ता. हवेली, जि. पुणे) येथील सोनल वाईन्स या दुकानात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून तब्बल १ लाख ४८ हजार ८०० रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक 95/2026 अन्वये BNS कलम 305(a), 331(3), 331(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी दीपक शंकर जगदाळे (वय 40, रा. गराडे, ता. पुरंदर, जि. पुणे) हे संबंधित दुकानात मॅनेजर म्हणून कार्यरत असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 1 मार्च 2026 रोजी रात्री 11.30 वाजेपासून 2 मार्च 2026 रोजी सकाळी 7.45 वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील विविध काउंटरमध्ये ठेवलेली रोकड चोरून नेली.

चोरीस गेलेल्या रकमेमध्ये ₹200 दराच्या 10 नोटा (₹2,000), ₹100 दराच्या 28 नोटा (₹2,800), ₹50 दराच्या 691 नोटा (₹34,500), ₹20 दराच्या 1,732 नोटा (₹34,640), ₹10 दराच्या 1,073 नोटा (₹10,730), तसेच ₹10, ₹5 व इतर दराची नाणी (₹34,130) आणि बदलासाठी ठेवलेल्या विविध दराच्या फाटक्या नोटा (₹30,000) यांचा समावेश असून एकूण रक्कम ₹1,48,800 इतकी आहे.
सदर गुन्ह्याची नोंद 2 मार्च 2026 रोजी सायंकाळी 4.47 वाजता करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक पाटील पुढील तपास करत आहेत. महाराष्ट्र पोलीस हवालदार निकम यांनी गुन्हा नोंदवला असून पोलीस निरीक्षक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध सुरू आहे.

परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून अज्ञात चोरट्याचा माग काढण्याचे काम सुरू असून लवकरच आरोपीचा छडा लावण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

येवल्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे लोकार्पण संपन्न!

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक ही केवळ वास्तू नसून समता, सामाजिक न्याय, श्रमप्रतिष्ठा आणि परिवर्तनवादी विचारांचे प्रतीक आहे.. पोलीस वार्ता, येवला | शहरात उभारण्यात आलेल्या...

खडका चौफुलीजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अनोळखीचा मृतदेह

0
भुसावळ : शहरातील खडका चौफुलीजवळ ग्रीन व्ह्यू हॉटेल परिसरात देशी दारू दुकानाच्या शेजारी असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शनिवारी एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात...

वृद्धावस्था पेंशन में हो रही देरी पर कांग्रेस का विरोध, सीएमओ को सौंपा ज्ञापन…

0
बुरहानपुर जिले के नगर कांग्रेस कमेटी शाहपुर एवं कांग्रेस पार्षद दल ने लंबित पेंशन का तत्काल भुगतान और नियमित पेंशन व्यवस्था सुनिश्चित करने की उठाई...

जीवनलाल राठौर शिव सेना के कामगार सेना के जिला प्रमुख नियुक्त !

0
रतलाम (चंद्रशेखर जायसवार ) शिवसेना मुख्य नेता माननीय एकनाथ सिंंदे जी (उप मुख्यमंत्री महाराष्ट्र) की अनुशंसा व चैररम ऑफिसर अनुकूल जी की सहमति पर शिवसेना...

यावल तालुक्यात पर्यटन स्थळांवर जाण्यास नागरिकांना बंदी, तहसीलदार नाझीकर यांचे आदेश!

निंबा देवी धरण, वड्डी धरण, मोर धरण, आणि शेळगाव बॅरेज आणि वाझडिसरा तलाव, हरिपुरा धरण तसेच यावल येथील पाटचारी व तलाव परिसरात प्रवेश बंदी.. पोलीस...

error: Content is protected !!