अपघातात गाडीतील 5 जणांचा मृत्यू झाला असून सर्व राहणार पिंपळगाव बसवंत येथील असल्याची प्राथमिक माहिती..
पोलीस वार्ता, नाशिक : जिल्ह्यातील कळवण तालुक्यात असलेल्या वणी सप्तश्रृंग गड देवस्थान घाटात दि.7 डिसेंबर रोजी सायंकाळी भाविकांच्या गाडीचा अपघात झाला यात इनोव्हा गाडी क्र. एमएच 15 बीएन 0555 ही सुमारे 600 फूट दरीत कोसळून अपघातग्रस्त झाली. अपघातात गाडीतील 5 जणांचा मृत्यू झाला असून सर्व राहणार पिंपळगाव बसवंत येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
घटनास्थळी पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, उपविभागीय अधिकारी नरेश अकुनुरी, तहसीलदार रोहिदास वारुळे आदींसह वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी राजपूत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे हे स्थानिक पातळीवर मदत कार्य करणाऱ्या सर्व पथकाच्या संपर्कात आहेत.
घटनास्थळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली मदत कार्य सुरू आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या दुर्दैवी घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मृत्यू झालेल्या भाविकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे म्हंटले आहे. तसेच मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू असून संपूर्ण यंत्रणा तेथे सज्ज ठेवण्यात आली आहे. मृत्यू पावलेल्या भाविकांच्या वारसांना प्रति 5 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य राज्य सरकारच्या वतीने देण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
आयुष्मान घोटाले और प्रशासनिक सांठगांठ की निष्पक्ष जांच की मांग
रमाकांत मोरे
बुरहानपुर: अमरावती रोड स्थित चर्चित गुड अस्पताल को लेकर एक बार फिर प्रशासन और...
भुसावळ : नगर परिषदेतील सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सोनू सारवान यांच्या उपस्थितीत विशेष आढावा बैठक घेण्यात...
सकाळपासून शोध सुरू असलेल्या अदनान खानचा रात्री मृतदेह आढळला; बांधकामस्थळी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
भुसावळ : (निलेश फिरके) अमरदीप चौक परिसरातून बुधवारी सकाळपासून बेपत्ता असलेल्या सहा...