खाजगी दुकाने, खाद्यगृहे, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, मॉल्स, रिटेलर्स यासह कर्मचारी, कामगार व अधिकारी या सर्वांना 2 डिसेंबर 2025 रोजी पगारी सुट्टी..
पोलीस वार्ता, नाशिक : आज 2 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7:30 वाजेपासून नाशिक जिल्ह्यातसह राज्यातील इतर नगरपरिषद/ नगरपालिका/ नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी मतदान सुरू झाले असून मतदारांना त्यांचा मतदानाचा अधिकार-हक्क बजावता यावा यासाठी खाजगी दुकाने, खाद्यगृहे, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, मॉल्स, रिटेलर्स यासह कर्मचारी, कामगार व अधिकारी या सर्वांना 2 डिसेंबर 2025 रोजी पगारी सुट्टी देण्यात आली आहे, असे नाशिक कामगार विभाग विकास उपआयुक्त माळी यांनी उद्योग, ऊर्जा, कामगार व खणिकर्म विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडील 28 नोव्हेंबर 2025 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार जाहीर केले आहे.
राज्यात निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना, मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क पूर्ण करण्यासाठी भरपगारी सुटी देण्यात आली आहे. ज्याठिकाणी कामगार व अधिकारी यांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेलच तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदान करण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत त्यांनी संबंधित महानगरपालिका आयुक्त अथवा जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. तसेच शासन निर्णयाची याची दक्षता घ्यावी.
या निर्णयासंबंधी येणाऱ्या माहिती व तक्रारीचे त्वरित निर्णय घेण्यासाठी दि.त्र्य.पाटोळे, सरकारी कामगार अधिकारी, मो.क्र. 9136871898, तु.गं.बोरसे, सरकारी कामगार अधिकारी, मो.क्र. 9890150632, नि.रं.खैरनार दुकाने निरीक्षक, मो.क्र. 7387731931, यो.मा.जाधव, दुकाने निरीक्षक, मो.क्र. 7741861351 यांची नियुक्ती करण्यात आली आहे असे देखील कामगार उपआयुक्त माळी यांनी जाहीर केले आहे.
भुसावळ : आगामी जनगणना 2027 च्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी स्व-गणना (Self Enumeration) प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून त्याबाबत प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत....
बुरहानपुर (म.प्र.), 30 अप्रैल 2026 — जिला लोक अभियोजन अधिकारी कार्यालय द्वारा जारी प्रेस विज्ञप्ति के अनुसार, सड़क दुर्घटना के एक मामले में न्यायालय...
बुरहानपूर (नि.प्र.) : वर्ष 2026 मधील दुसरी राष्ट्रीय लोकअदालत येत्या 9 मे रोजी, शनिवार, कुटुंब न्यायालय (फॅमिली कोर्ट) बुरहानपूर येथे आयोजित करण्यात येणार आहे....