Homeआरोग्यथकीत मालमत्ता कर भरण्यासाठी 'अभय योजना’ 31 डिसेंबर 2025 पर्यंत नगरपरिषदा व...

थकीत मालमत्ता कर भरण्यासाठी ‘अभय योजना’ 31 डिसेंबर 2025 पर्यंत नगरपरिषदा व नगरपंचायत क्षेत्रात लागू..

जिल्ह्यातील ‘मालमत्ता कर शास्ती माफी अभय योजना’ लागू करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले..

पोलीस वार्ता, नाशिक : जिल्ह्यातील नगरपरिषदा, नगरपंचायती क्षेत्रातील मालमत्ता कर मोठ्या प्रमाणात थकीत असल्यामुळे नागरिकांची म्हणजे मालमत्ता धारकांची आर्थिक अडचण होत असून थकित व चालू मालमत्ता कर भरणा नियमित होत नाही आहे. या कारणामुळे जिल्ह्यातील ‘मालमत्ता कर शास्ती माफी अभय योजना’ लागू करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्यागिक नगर अधिनियम, 1965 चे कलम 150(अ) (1) नुसार बिलाच्या न भरलेल्या रक्कमेवर संबंधित नगरपरिषद, नगरपंचायती यांच्याकडून दरमहा 2 टक्के शास्ती लावण्यात येते. यामुळे मालमत्ता धारकाच्या एकुण थकबाकी मध्ये वाढ होऊन नगरपरिषद/नगरपंचायत क्षेत्रात कर वसुली कमी झाल्यामुळे यांचा विपरित परिणाम नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या अत्यावश्यक सेवा सुविधांवर होत आहे. थकित शास्तीमुळे मालमत्ताधारक त्यांचेकडील नियमित कराचा वेळेत भरणा करण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे मालमत्ता धारकांना कर भरण्यास प्रवृत्त करुन प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.
थकित मालमत्ता करावरील 2 टक्के शास्ती माफ करण्याच्या दृष्टीने सुधारित तरतूदीनुसार खालील अटी व शर्तीस अधीन राहून मालमत्ता कर शास्ती माफी अभय योजना लागू करण्यात येत आहे. ही योजना वैयक्तिक मालमत्तेवरील थकित रक्कमेवर लागू असेल. अभय योजना शास्ती सूट ही योजना डिसेंबर 2025 पर्यत लागू असेल. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उतुंग यश: पोलीस कर्मचाऱ्याच्या सुपुत्रांचा पोलीस अधिक्षकांकडून गौरव

0
:जळगाव - येथील  पोलीस दलात कार्यरत असलेले किशोर लक्ष्मण सोनटक्के यांचे सुपुत्र विकास किशोर सोनटक्के यांनी १२ वी विज्ञान (Science) शाखेच्या परीक्षेत ८०% गुण...

जामनेरमध्ये बेकायदेशीर HTBT कापूस बियाण्यांवर धाड ; ९.१५ लाखांचा साठा जप्त, चौघांविरुद्ध गुन्हा

0
जामनेर, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यात प्रतिबंधित व बेकायदेशीर HTBT (हर्बिसाइड टॉलरंट बीटी) कापूस बियाण्यांच्या साठवणूक व विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत जामनेर पोलिसांना मोठे...

मोर धरण परिसरातील शासकीय जमीन तात्काळ रिकामी करण्याचे आदेश

0
भुसावल - मोर धरणालगत हिंगोणे व बोरखेडा बुद्रुक ता .यावल परिसरातील शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे शेती करणाऱ्या अथवा ताबा घेतलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ जमीन रिकामी करावी,...

भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद

0
भुसावळ : येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली....

काँग्रेसचे भीष्म पितामह अनंतराव थोपटे यांचे निधन; ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  …

0
भोर प्रतिनिधी :- ( संतोष मोहिते )महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि निष्ठावान नेतृत्व, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भोर - वेल्हा - मुळशी...

error: Content is protected !!