Homeआरोग्यलेखक सोनकांबळे यांच्या "आय म्या पंतप्रधान पाह्यला" या पुस्तकाचे प्रकाशन लंडनमध्ये होणार!

लेखक सोनकांबळे यांच्या “आय म्या पंतप्रधान पाह्यला” या पुस्तकाचे प्रकाशन लंडनमध्ये होणार!

पुस्तकात ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय सैन्याची विजयी गाथा जगासमोर मांडली आहे..

पोलीस वार्ता, नाशिक : महाराष्ट्राचे भूमिपुत्र लेखक सुभाष सोनकांबळे यांनी लिहिलेल्या बहुचर्चित ‘आय म्या पंतप्रधान पाह्यला’ या पुस्तकाचे प्रकाशन जगातील शंभर देशांत होणार असून पहिले प्रकाशन सोनकांबळे थेट लंडन येथील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक स्थळी करणार आहेत. या पुस्तकात लेखक सोनकांबळे यांनी भारताने पाकिस्तानवर मिळवलेला विजय तसेच ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय सैन्याची विजयी गाथा जगासमोर मांडली आहे.
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद भारतच नव्हे तर संपूर्ण जगाच्या प्रगतीला किती घातक आहे, पाकिस्तानचा खरा दहशतवादी चेहरा जगासमोर उघडा करण्याचं तसेच यापूर्वी पाकिस्तानने भारतावर छुपे युद्ध लादत 20/11 ला वेठीस धरले होते. मुंबईवर भ्याड हल्ला करून शेकडो निष्पाप लोकांचा बळी घेतला होता. त्यावेळी पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसाब याला मुंबई पोलिसांनी जीवंत पकडले होते. भारताची वाढती आर्थिक आणि सामाजिक प्रगती रोखू पाहणाऱ्या या भ्याड हल्ल्यावरही लेखक सोनकांबळे यांनी आपल्या पुस्तकात मांडले आहे. ‘आय म्या पंतप्रधान पाह्यला’ हे लेखक सोनकांबळे यांचे ज्वलंत आत्मकथन आहे. त्यात जगातील संपूर्ण दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी भारत कसा विश्वगुरु ठरेल. याचे विचार मांडण्यात आले आहे.

26/11 चा मुंबईवरील दहातवादी हल्ला आणि आताचा पहेलगामवरील हल्ल्याचे जळजळीत वास्तव आणि अशा भारतात घडणाऱ्या घटना जगातील सामान्य लोकांना दहशतवादाविरोधात विचार करायला आणि त्याविरोधात लढ्यात स्वयंप्रेरणेने सहभागी व्हायला, सांगणारे विचार आहेत.
दरम्यान, दहशतवादी अड्डा असलेला पाकिस्तान भारत व जगाची प्रगती रोखण्यासाठी कोणत्या खालच्या थराला जावू शकतो, याचे चित्रही लेखक सोनकांबळे यांनी आपल्या ‘आय म्या पंतप्रधान पाह्यला’ या पुस्तकात आपल्या लेखणीच्या शैलीत रेखाटले आहे. त्यांच्या या नवीन पुस्तक संग्रहाला सर्वांनी वाचावे, आणि त्यांना पुढील नवनवीन विषयांवर लिखाणासाठी प्रोत्साहन द्यावे. हीच सर्व पुस्तक प्रेमी व भारतीयांकडून लेखक सोनकांबळे यांची अपेक्षा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उतुंग यश: पोलीस कर्मचाऱ्याच्या सुपुत्रांचा पोलीस अधिक्षकांकडून गौरव

0
:जळगाव - येथील  पोलीस दलात कार्यरत असलेले किशोर लक्ष्मण सोनटक्के यांचे सुपुत्र विकास किशोर सोनटक्के यांनी १२ वी विज्ञान (Science) शाखेच्या परीक्षेत ८०% गुण...

जामनेरमध्ये बेकायदेशीर HTBT कापूस बियाण्यांवर धाड ; ९.१५ लाखांचा साठा जप्त, चौघांविरुद्ध गुन्हा

0
जामनेर, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यात प्रतिबंधित व बेकायदेशीर HTBT (हर्बिसाइड टॉलरंट बीटी) कापूस बियाण्यांच्या साठवणूक व विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत जामनेर पोलिसांना मोठे...

मोर धरण परिसरातील शासकीय जमीन तात्काळ रिकामी करण्याचे आदेश

0
भुसावल - मोर धरणालगत हिंगोणे व बोरखेडा बुद्रुक ता .यावल परिसरातील शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे शेती करणाऱ्या अथवा ताबा घेतलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ जमीन रिकामी करावी,...

भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद

0
भुसावळ : येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली....

काँग्रेसचे भीष्म पितामह अनंतराव थोपटे यांचे निधन; ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  …

0
भोर प्रतिनिधी :- ( संतोष मोहिते )महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि निष्ठावान नेतृत्व, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भोर - वेल्हा - मुळशी...

error: Content is protected !!