यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील तिघांचा केदारनाथ हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. केदारनाथ दर्शन करून परत येत असताना ही घटना घडली.

पोलीस वार्ता, यवतमाळ : उत्तराखंडमधून आज पुन्हा एकदा हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. रुद्रप्रयागच्या गौरीकुंड आणि सोनप्रयाग परिसरात आज दि.15 जून, रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास हेलिकॉप्टर कोसळले आहे. या घटनेत सात यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच या अपघातात यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील तिघांचा समावेश आहे. हे हेलिकॉप्टर आर्यन कंपनीचे असून हेलिकॉप्टर केदारनाथहून यात्रेकरूंना घेऊन परत येत असताना ही घटना घडली, NDRF आणि SDRF टीम घटनास्थळी दाखल झाले आहेत. बचावकार्यामुळे सध्या येथील सर्व सेवा बंद आहेत. खराब हवामानामुळे हा अपघात झाला असल्याचे समजले.
उत्तराखंडचे एडीजी कायदा आणि सुव्यवस्था डॉ.व्ही. मुरुगेशन यांनी सांगितले की, गौरीकुंडमध्ये बेपत्ता झालेले हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंग राजवार यांनी सांगितले की, गौरीकुंडच्या वर गवत कापणाऱ्या नेपाळी वंशाच्या महिलांनी हेलिकॉप्टर अपघाताची माहिती दिली. गौरी माई खर्कच्या वरच्या जंगलात हेलिकॉप्टर पडले.
पायलटने हेलिकॉप्टरला दरीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र याचदरम्यान हेलिकॉप्टर कोसळले. हेलिकॉप्टरमध्ये पायलट व्यतिरिक्त पाच प्रवासी आणि एक अर्भक देखील होते. NDRF, SDRF, पोलीस दलासह सर्व बचाव पथक स्थानिक लोकांच्या मदतीने शोध आणि बचाव कार्यात गुंतले आहेत, या संपूर्ण प्रकरणाची माहिती लवकरच दिली जाईल.
-
हेलिकॉप्टरमधील मृत्यू झालेल्यांची नावे
1. कॅप्टन राजबीर सिंग चौहान – पायलट, जयपूरचा रहिवासी
2. विक्रम रावत – BKTC, रासी, उखीमठ येथील रहिवासी
3. विनोद देवी – उत्तर प्रदेशातील रहिवासी, वय 66 वर्षे
4. तृष्टी सिंग – उत्तर प्रदेशातील रहिवासी, वय 19 वर्षे
5. राजकुमार सुरेश जैस्वाल – यवतमाळ, महाराष्ट्र, वय 41 वर्षे
6. श्रद्धा राजकुमार जैस्वाल – यवतमाळ, महाराष्ट्रातील रहिवासी
7. काशी – मुलगी, वय 2 वर्षे, यवतमाळ, महाराष्ट्रातील रहिवासी
घटनास्थळावरून सर्व 7 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

-
हेलिकॉप्टर अपघाताची चौकशी होणार







































