(यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर मंजुषा सागर )
यवतमाळ जिल्ल्यात वडकी हे गाव छोटेसे असले तरी सर्व धर्म समभाव जपणारे गाव आहे.वह एकतेचे व मानुसकीचे प्रतीक आहे , श्रद्धा, त्याग , एकता दर्शविणारा कुरबानीचा सण म्हणजे बकरी ईद .हर्ष उल्हासाने वडकी या गावात जामा मशीद येथे बकरी ईद शांततेत साजरी करण्यात आली .ईदगाह च्या ठिकाणी सकाळी आठ ते नऊ या दरम्यान नमाज अदा करण्यात आली . त्यापूर्वी मौलाना अबुझर यांच्या माध्यमातुन खुदबा अदा करण्यात आले . वडकी जामा मस्जीद कमिटी अध्यक्ष शेख गफ्फार , अयुब पठाण , हनीफ शेख ‘ अहमद शेख ,नसीब शेख कादरभाई शेख ,इरफान पठाण , बंटी भाई , नवाब पठाण रियाज पठाण ,बबलु शेख ‘सादिक शेख यांच्या समवेत शंभर ते सव्वाशे नमाजीनी बकरी ईद ची नमाज श्रद्धेने नमाज अदा केली .सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकां आलींगन घेत ईद च्या शुभेच्छा एकमेकांना दिल्या . यावेळेस बकरा ईद कार्यक्रम शांततेत व सुव्यवस्थित व्हावा याकरिता वडकी पोलीस स्टेशन यांनी पोलीस बंदोबस्त दिला होता .




































