जळगांव – शरसतील कालिंका माता मंदिराजवळ श्री प्लाझा परिसरात शनिवार (४) रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास तरुणाच्या धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आला.तो जीव वाचवण्यासाठी पडत होता मात्र त्यावर सपासप वार होत होते असे प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले.पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या वादातून त्याचा खून करण्यात आल्याचे मृताच्या आईने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.संशयितांने चार दिवसापूर्वीच धमकी दिल्याची ही माहिती समोर आली.पाच संशयताविरुद्ध शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

जुनी औद्योगिक वसाहत परिसरातील आयोध्या नगर अशोक नगर भागात आकाश पंडित भावसार सोनार (वय २७) आई कोकिळा पत्नी पूजा श्री व मीठ या दोन मुलांसह राहत होता अजंठा चौकात हर्षाली रोडलाईन्स नावाने ट्रान्सपोर्ट व्यवसाय करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करायचा.शनिवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास आकाशी पत्नी पूजा भावसार चा मावस भाऊ अजय मंगेश मोरे, चेतन रवींद्र सोनार व तीन अनोळखी असे लोक दोन स्कुटीने आकाशच्या घरी आले त्यांनी आकाश बद्दल विचारणा केली तेव्हा पूजाने आकाशच्या मोबाईलवर फोन करून कुठे आहेस असे विचारल्यावर आकाशने श्री प्लाझा ए वन भरीत सेंटर जवळ उभा असल्याचे सांगितले. त्यानंतर संशयित अजय मोरे, चेतन सोनार व इतर तिघे मारेकरी श्री प्लाझाच्या दिशेने गेले. घडलेल्या अनपेक्षित प्रकार अन डोळ्यात देखत आकाशला मरेपर्यंत झालेले वार पाहता प्रत्यक्षदर्शींनी एमआयडीसी पोलिसांना फोन केले कुणाल सोनार यांच्या मदतीने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आकाश भावसारला उचलून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयात दाखल केले तेथे वैद्यकीय पथकाने तपासून त्याला मृत घोषित केले.


























