भुसावळ – शहरातील हनुमान नगर कडे जाणाऱ्या साईबाबा मंदिराजवळील टी.व्ही ग्राउंडवर सार्वजनिक जागी रेकॉडवरील आरोपी हिरामण ऊर्फे किशोर सरकू जाधव (गोजऱ्या) वय ३२ राहणार वाल्मिक नगर हा ता.१ मार्च रोजी सव्वा नऊ वाजेला कोणतातरी गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने तसेच जिल्ह्याधिकारी यांचे आदेशांचे उल्लंघन करून घातक हत्यार बेकायदेशीर कब्जात बाळगतांना मिळून आला.पोलिसांनी गुन्ह्यातील संशयित आरोपी निष्पन्न करून त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून एक गावठी पिस्टल सह दोन जिवंत काडतुस असे एकूण १७ हजार रुपये किंमतीचे मिळून आले.याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशनला ता.१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरील कारवाई पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी,अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे,पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनिरी मंगेश जाधव,विजय नेरकर, महेश चौधरी,प्रशांत परदेशी,योगेश माळी,राहुल वानखेडे,भूषण चौधरी,सचिन चौधरी, अमर आढळे, जावेद शहा,योगेश महाजन अशांनी मिळून केली.
,


























