Homeक्राईमभुसावळमध्ये २५.४२ लाखांच्या लुटीचा पर्दाफाश; ड्रायव्हरच ठरला सूत्रधार, सहा जण अटकेत

भुसावळमध्ये २५.४२ लाखांच्या लुटीचा पर्दाफाश; ड्रायव्हरच ठरला सूत्रधार, सहा जण अटकेत

भुसावळ –  तालुका पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या तब्बल २५ लाख ४२ हजार रुपयांच्या लुटीचा छडा पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत उघड केला आहे. तपासात उघड झाले की, फिर्यादीच्या कंपनीतच काम करणारा ड्रायव्हर शाहीद बेग हा या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असून, त्याच्यासह एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून २३ लाख ४२ हजार रुपये रोख आणि तीन मोबाईल फोन जप्त केले आहेत.

दि. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास फिर्यादी मोहम्मद यासीन ईस्माइल हे आपल्या कंपनीचे (रॉयल कंपनी) २५.४२ लाख रुपये घेऊन मोटरसायकलवरून घरी जात असताना, खडके शिवारातील कच्च्या रस्त्यावर तिघा अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या गाडीला धडक दिली. यानंतर त्यांनी पैशांची बॅग हिसकावून पळ काढला.या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

तपासात उघड झालेले सूत्र : –

घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.चौकशीत फिर्यादीचा ड्रायव्हर शाहीद बेग संशयाच्या भोवऱ्यात सापडला.अखेर चौकशीत त्यानेच लुटीचा कट रचल्याचे कबूल केले.शाहीद बेगनेच आपल्या साथीदारांना पैशांच्या वाहतुकीची माहिती दिली होती. त्यानंतर मुजाहीद मलीक आणि मोहम्मद दानिश यांनी हा कट रसलपूर (ता. रावेर) येथील अजहर फरीद मलक, अमीर खान युनुस खान आणि ईजहार बेग इरफान बेग यांना सांगितला. या तिघांनी प्रत्यक्ष लूट केली.

अटक केलेले आरोपी : –

शाहीद बेग इब्राहिम बेग (वय २५, रा. भुसावळ) – मुख्य सूत्रधार / ड्रायव्हर, मुजाहीद आसीफ मलीक (वय २०, रा. भुसावळ),मोहम्मद दानिश मोहम्मद हाशीम (वय १९, रा. भुसावळ),अजहर फरीद मलक (वय २४, रा.रसलपूर, ता.रावेर),अमीर खान युनुस खान (वय २४, रा. रसलपूर, ता. रावेर), ईजहार बेग इरफान बेग (वय २३, रा. रसलपूर, ता. रावेर)

गुन्हेगारी पार्श्वभूमी : –

आरोपींपैकी शाहीद बेगवर मलकापूर व बोराखेडी येथे केबल चोरीचे गुन्हे दाखल आहेत, तर अमीर खानवर रावेर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद आहे.

पुढील तपास : –

लुटीच्या रकमेपैकी २.०० लाख रुपये अद्याप जप्त करणे बाकी असून, गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकलही जप्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व आरोपींना न्यायालयाने ३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

पोलीस पथकाची कामगिरी :

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश गायकवाड (भुसावळ तालुका), राहुल गायकवाड (स्थानीक गुन्हे शाखा), राहुल वाघ (बाजारपेठ पो.स्टे.) यांच्या पथकांनी केली.
तपासात अनेक पोलीस अधिकारी व अंमलदारांनी सक्रिय सहभाग नोंदवला असून, त्यांचे कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळमध्ये जात प्रमाणपत्रावरून आरोप-प्रत्यारोप ; प्रकरण व्हिजिलन्स समितीकडे

0
भुसावळ - नगरपालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाच्या नगराध्यक्षा गायत्री गौर यांनी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे व त्यांच्या पत्नी रजनी सावकरे यांच्यावर आरोप केल्याची...

ओव्हरलोड राख भरण्यावरून वाद ; धमकी व मारहाणीचा गुन्हा दाखल

0
भुसावळ - तालुक्यातील दिपनगर परिसरात ओव्हरलोड राख भरण्याच्या वादातून शिवीगाळ, धमकी व मारहाणीची घटना घडल्याची तक्रार भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे....

भुसावळात भट्टीजवळ उभी रिक्षा पेटली; मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली

0
भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील शेठ घासीलाल अँड सन्स या दुकानासमोर उभी असलेली रिक्षा अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या आगीत रिक्षेचे मोठ्या प्रमाणात नुकसान...

भुसावळात ‘अमृत’ योजनेचा घोटाळा? नगराध्यक्षांचा संताप उसळला ; ठेकेदारांवर कारवाईची मागणी

0
८-१० वर्षे रखडलेली पाणी योजना , खर्च ९० कोटींवरून १३५ कोटींवर; नागरिकांना पाण्यासाठी हाल भुसावळ : शहरातील पाणीपुरवठा आणि विकासकामांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री...

मुहकीं देखभाल बच्चोंके संपूर्ण स्वास्थ्य के लिए बेहद जरूरी है।

0
इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस, बरेली के विशेषज्ञों का मानना है कि यदि शुरुआत से ही बच्चों के मुंह की सफाई पर ध्यान दिया जाए,...

error: Content is protected !!