Homeआरोग्यमहाराष्ट्र होमगार्ड संघटनेत अनेक वर्ष कर्तव्य बजावून श्री.अशोक चौधरी आणि श्री.देवाजी पवार...

महाराष्ट्र होमगार्ड संघटनेत अनेक वर्ष कर्तव्य बजावून श्री.अशोक चौधरी आणि श्री.देवाजी पवार सेवेतून निवृत्त!

देशसेवा कार्यात आपले अनेक वर्ष सेवा देऊन निवृत झालेल्या दोन्हीं अधिकाऱ्यांचे सर्वांनी कौतुक करून त्यांना निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या..

पोलीस वार्ता, नाशिक : महाराष्ट्र पोलीस दलाला राज्यात अंतर्गत सुरक्षा राखणे कामी सहाय्यकारी दल म्हणून महाराष्ट्र होमगार्ड संघटना नेहमी काम करत आली आहे. आणि हेच महाराष्ट्र होमगार्ड संघटनेचे प्रमुख कर्तव्य देखील आहे. अश्या राष्ट्रसेवेच्या होमगार्ड संघटनेतून बरीच वर्ष आपले कर्तव्य बजावून विविध पदांच्या जवाबदाऱ्या पुर्ण करून नाशिक येथील मा.श्री.अशोक रघुनाथ चौधरी हे कंपनी नायक या पदावर आपली सेवाकरून दि.31 मे 2025 रोजी होमगार्ड सेवेतून निवृत्त झाले आहे.
त्याचा सेवापुर्ती सोहळा नाशिक जिल्हा होमगार्ड मुख्य कार्यालय, सीबिस या ठिकाणी दि.31 मे ला संपन्न झाला. या कार्यक्रम प्रसंगी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून चौधरी यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस दलाचे व होमगार्ड संघटनेचे अधिकारी, कर्मचारी तसेच तालुका प्रभारी समादेशक, होमगार्ड जवान, होमगार्ड महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाशिक जिल्ह्याचे प्रशासकीय अधिकारी श्री.सुरेश जाधव यांनी शाल-पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सेवानिवृत्त श्री.अशोक रघुनाथ चौधरी आणि त्यांच्या पत्नी यांचा सन्मान केला.
यावेळी कळवण येथील होमगार्ड समादेशक अधिकारी म्हणून कार्यरत असलेले श्री.देवाजी पवार हे देखील 31 मे ला सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा देखील सन्मान श्री.तडवी होमगार्ड केंद्रनायक सामग्री प्रबंधक यांनी केला. या कार्यक्रम प्रसंगी संपूर्ण पवार परिवार उपस्थित होता. आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांविषयी आपले मनोगत व्यक्त केले. आणि त्यांच्या होमगार्ड संघटनेतील चांगल्या कामांना उजाळा दिला.

राज्यात पोलिसांसोबत काम करताना शांतता व सुव्यवस्था राखण्यासोबतच इतरही बरीच कर्तव्य होमगार्ड संघटनेला सेवेतून पार पाडावी लागतात अग्निशमन, विमोचन, अतिवृष्टी, पूरपरिस्थिती, भूकंप, वादळे वगैरे परिस्थितीमुळे निर्माण होणारी आपत्कालीन परिस्थिती अशा निरनिराळया प्रकारच्या परिस्थितीच्या वेळी होमगार्ड संघटना सरकारच्या आदेशाने कार्यरत केली जाते. आपत्कालीन अथवा संपकालीन परिस्थितीमध्ये समाजस्वास्थ्यासाठी जीवनावश्यक सेवा चालू ठेवणे व तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा अबाधित ठेवणे याबाबत देखील होमगार्ड संघटनेला सूचनेनुसार जबाबदारी उचलावी लागते. अश्या देशसेवा कार्यात आपले अनेक वर्ष सेवा देऊन निवृत झालेल्या दोन्हीं अधिकाऱ्यांचे आलेल्या सर्वांनी कौतुक करून त्यांना निरोगी आयुष्याच्या आणि पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. शेवटी आलेल्या पाहुण्यांनी अल्पआहार घेतल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: गौतम जाधव, नाशिक, संपर्क: 9922838959
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

येवल्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे लोकार्पण संपन्न!

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक ही केवळ वास्तू नसून समता, सामाजिक न्याय, श्रमप्रतिष्ठा आणि परिवर्तनवादी विचारांचे प्रतीक आहे.. पोलीस वार्ता, येवला | शहरात उभारण्यात आलेल्या...

खडका चौफुलीजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अनोळखीचा मृतदेह

0
भुसावळ : शहरातील खडका चौफुलीजवळ ग्रीन व्ह्यू हॉटेल परिसरात देशी दारू दुकानाच्या शेजारी असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शनिवारी एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात...

वृद्धावस्था पेंशन में हो रही देरी पर कांग्रेस का विरोध, सीएमओ को सौंपा ज्ञापन…

0
बुरहानपुर जिले के नगर कांग्रेस कमेटी शाहपुर एवं कांग्रेस पार्षद दल ने लंबित पेंशन का तत्काल भुगतान और नियमित पेंशन व्यवस्था सुनिश्चित करने की उठाई...

जीवनलाल राठौर शिव सेना के कामगार सेना के जिला प्रमुख नियुक्त !

0
रतलाम (चंद्रशेखर जायसवार ) शिवसेना मुख्य नेता माननीय एकनाथ सिंंदे जी (उप मुख्यमंत्री महाराष्ट्र) की अनुशंसा व चैररम ऑफिसर अनुकूल जी की सहमति पर शिवसेना...

यावल तालुक्यात पर्यटन स्थळांवर जाण्यास नागरिकांना बंदी, तहसीलदार नाझीकर यांचे आदेश!

निंबा देवी धरण, वड्डी धरण, मोर धरण, आणि शेळगाव बॅरेज आणि वाझडिसरा तलाव, हरिपुरा धरण तसेच यावल येथील पाटचारी व तलाव परिसरात प्रवेश बंदी.. पोलीस...

error: Content is protected !!