भुसावळ – शहरातील संतोषी माता बहुउद्देशीय हॉल बेकायदेशीर असल्याने नगर पालिकेने ताब्यात घेतल्यापासून होणाऱ्या सरावाच्या ठिकाणी सर्व खेळाडूंना तसेच पथकाला अडचण होत आहे. विशेष अडचण महिला खेळाडूंना होत आहे.कराटे,कब्बडी तसेच ढोल पथकातील लोकांना तेथे कपडे बदलण्यासाठी,पाणी मारण्यासाठी समस्था निर्माण होत आहे.याबाबत उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील,पालिका मुख्याधिकारी विवेक धांडे, नगराध्यक्षा गायत्री भंगाळे तसेच तिघे गटनेत्यांना जय मातृ क्रीडा मंडळ तर्फे निवेदन देण्यात आले.
संध्याकाळी रोज सहा वाजेनंतर संतोषी माता बहुउद्देशीय हॉल मधील खोल्या तसेच त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात ठेवलेले ढोल, कब्बडी खेळाडूंच्या सरावासाठी स्व: खर्चाने मॅट ठेवण्यात आलेली आहे. प्रशासनाने खेळाडूंच्या सरावासाठी हॉल देण्यात यावा यासाठी जय मातृ क्रीडा मंडळ तर्फे निवेदन देण्यात आले.


























