आमदार डॉ.राहुल आहेर यांनी माघार घेत पक्षाने आपल्या भावाला म्हणजे नानाला तिकीट द्यावे अशी आग्रही भूमिका धरली.
चांदवड-देवळा विधानसभा आमदार आहेर; भावासाठी भाऊ थांबणार..
चांदवड | भावासाठी भाऊ थांबणार.. सध्या महाराष्ट्रात निवडणुकीचे वातावरण तापले असले तरी चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघात अनेक दिवसापासून मतदारांना प्रश्न भेडसावत होता, दोन्ही आहेर बंधू नाना आणि दादा कदाचित समोरासमोर उभे राहतात की काय??.. परंतु अखेर या प्रश्नाचे उत्तर देत आमदार डॉ.राहुल आहेर यांनी माघार घेत पक्षाने आपल्या भावाला म्हणजे नानाला तिकीट द्यावे अशी आग्रही भूमिका धरली आणि शेवटी आज संपूर्ण मतदारसंघात या विषयाला पूर्णविराम मिळाला. देवळा तालुक्यात किंवा चांदवड तालुक्यात जरी नानांनी प्रचारात आघाडी घेतली असली तरी मतदार मात्र आता आपले मत कोणाला देणार हा एक प्रश्न मतदारांपुढे असणार आहे. असा कुठलाही आमदार नाही की तो स्वतः थांबून दुसऱ्याला तिकीट द्या असे सांगेल. परंतु हे आमदार डॉ.राहुल आहेर यांनी करून दाखवले. चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघाची जागा भाजप साठी सुटणार का? शिंदे गटाला जाणार? हा एक प्रश्न मतदारांसमोर पुन्हा उभा आहे. त्यामुळे काय होईल हे येत्या 20 ऑक्टोबर नंतर आपल्या सगळ्यांना कळेल.
(भुसावळ लोहमार्ग पोलीस व आरपीएफची संयुक्त कारवाई; खंडव्याच्या प्रवाशाला ताब्यात घेतले)
भुसावळ (निलेश.के,फिरके). कर्नाटक एक्स्प्रेसमधून वाहतूक करण्यात येत असलेला ६० हजार २८० रुपये किमतीचा सुगंधित पानमसाला...
जनसेवा क्लिनिकवर पोलिसांची छापा कारवाई ; विविध इंजेक्शन्ससह औषधसाठा जप्त
भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील प्रीमियर हॉटेलसमोरील जनसेवा क्लिनिकमध्ये कोणतीही वैद्यकीय नोंदणी अथवा आवश्यक वैद्यकीय...
बांधकाम कामगारांना साहित्य वाटप; महिलांना संसारोपयोगी वस्तूंचे वितरण
कराड : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील विविध भागांतील महिलांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गटात) जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी...