Homeक्राईमशहरात गोळीबार ; संशयित फरार, पोलिसांकडून शोध सुरू

शहरात गोळीबार ; संशयित फरार, पोलिसांकडून शोध सुरू

मतदानाच्या दिवशी प्रकार घडल्याने उडाली खळबळ
जळगाव – शहरातील पिंप्राळा परिसरातील मयूर कॉलनी भागात गुरुवारी दुपारी वैयक्तिक वादातून गोळीबाराची घटना घडली.मिस्तरी कामाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून तुषार सोनवणे नामक व्यक्तीने मुस्तफा नावाच्या तरुणावर गोळीबार केला.सुदैवाने,गोळी हवेत सुटल्याने मुस्तफा हा थोडक्यात बचावला आहे.मतदानाच्या दिवशी घडलेल्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून संशयित आरोपी सध्या फरार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुस्तफा हा मिस्तरी काम करतो. त्याने संशयित आरोपी तुषार सोनवणे याच्याकडे आपल्या कामाचे थकीत पैसे मागितले होते. याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर टोकावर गेल्याने संशयित तुषारने आपल्याकडील शस्त्र काढून मुस्तफाच्या दिशेने गोळी झाडली. गोळीबार झाला तेव्हा मुस्तफाने प्रसंगावधान राखल्याने आणि गोळी हवेत गेल्याने मोठा अनर्थ टळला. घटनास्थळी पोलिसांना गोळीची पुंगळी मिळून आली आहे.
पोलीस प्रशासनाची धाव..
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनातर्फे तत्परता दाखवण्यात आली. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केला असून फरार आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
घटनेचा निवडणुकीशी संबंध नाही..
शहरात सध्या निवडणुकीचे वातावरण असल्याने या घटनेबाबत विविध चर्चांना उधाण आले होते. मात्र, “हा प्रकार केवळ वैयक्तिक वादातून आणि मजुरीच्या पैशांच्या कारणावरून घडला आहे. या घटनेचा निवडणुकीशी कोणताही संबंध नाही,” असे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना स्पष्ट केले.
याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.भरदिवसा झालेल्या या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चापोरा में अज्ञात जानवर ने तीन पशुओं का कीया शिकार पशुओं की हुई मौत

0
बुरहानपुर (सुरज दहे) जिले से 18 किलोमीटर दुरी पर ग्राम चापोरा के युवा किसान महेंद्र गुलाबराव दहे के घर के पास पशुओं के बाडे में...

भुसावळात तरुणास मारहाण; ११ ते १३ जणांविरुद्ध गुन्हा

0
भुसावळ : शहरातील वाल्मीक नगर येथील एचडीएफसी बँकेसमोर एका तरुणाला १० ते १२ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि. २९) दुपारी सुमारे...

भुसावळ पोलीस ॲक्शन मोडवर ; सराईत गुन्हेगार ताब्यात !

0
भुसावळ पोलीस उपविभाग व RPF ॲक्शन मोडमध्ये असून उपविभागात संयुक्त 'कॉम्बिंग ऑपरेशन' राबवून ६० हून अधिक संशयितांची झाडाझडती, सराईत गुन्हेगारांना घेतले ताब्यात आहे. भुसावळ शहरात...

रक्षकच बनले भक्षक, पोलिसच सहआरोपी 20 लाखांची रोख रक्कम लुटण्याचा होता डाव?

महिला पोलीस हवालदार व बोगस पत्रकाराच्या मदतीने त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम 20 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला.. पोलीस वार्ता, पुणे | नवले पूल...

चापोरा सरस्वती शिशु मंदिर में निशुल्क स्वास्थ्य शिवीर संपन्न

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा के सरस्वती शिशु मंदिर परिसर में ऑल इज़ वेल हॉस्पिटल बुरहानपुर द्वारा रविवार 26 जुलाई को नि:शुल्क स्वास्थ्य...

error: Content is protected !!