भुसावळ – शहरातील गडकरी नगर,करूनेश्वर महादेव मंदिर जवळील संशयित आरोपी प्रशांत अग्रवाल याने विठ्ठल मंदिर वार्डातील विठ्ठल रखुमाई क्रेडिट सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावर रुक्मिणी फाउंडेशन मार्फत शासनाच्या विविध विभागात शासन सेवक (ए.एस.ई.बी) मध्ये नोकरीस लावून देण्याचे अमिष देवून सात लाख रुपयात आथिर्क फसवणूक केली.
विठ्ठल मंदिर वार्डातील रहिवासी यशवंत रेवा कोलते उफे निलेश यांना शासनाच्या विविध विभागात शासन सेवक (ए.एस.ई.बी) मध्ये नोकरीस लावून देण्याचे अमिष दाखवित एक लाख रुपये पगार मिळेल असे भूलथापा मारून विठ्ठल मंदिर वार्डातील विठ्ठल रखुमाई क्रेडिट सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावर चक्क सात लाख रुपयांत फसवणूक केली होती.सदरील इसम हा कार्यालयाच्या पाठीमागे हाकेच्या अंतरावर राहत असल्याने बरेच वर्ष नोकरी मिळण्याची वाट पाहिली मात्र शेवटी निराशा आल्याने आपली फसवणूक झालेली असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी कार्यालयात प्रशांत अग्रवाल यांनी भेट घेवून नोकरीसाठी दिलेले पैसे परत मागणी केल्याची रट लावल्याने आपले पितळ उघडे झाल्यास बाकी ही व्यक्तींना पैसे परत दयावे लागण्याची वेळ येवू नये म्हणून अग्रवाल याने शक्कल लढवून यशवंत कोलते यास तारीख पे तारीख देत कासवांच्या गतीने दोन लाख रुपये दिले मात्र.बाकी पैसे ही लवकरच देण्याचे आश्वासन देत आद्यपावतो एक रुपया सुद्धा परत केलेला नाही.
अखेर शेवटी सेवानिवृत्त लोहमार्ग पोलीस कर्मचारी यांचे मुलांची ही आर्थिक फसवणूक झाल्याने त्यांनी बाजारपेठ पोलीस स्टेशनला ता.२१ रोजी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी प्रशांत अग्रवाल यास पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती जिल्ह्याभरात पसरताच आर्थिक फसवणूक झालेल्यांची पोलीस स्टेशन गाठले यावेळी यशवंत कोलते यास माहिती मिळाली की,प्रशांत अग्रवाल यास पोलिसांनी ताब्यात घेतले.या युवकाने तात्काळ वडील रेवा कोलते यांच्याशी संपर्क साधून पोलीस स्टेशनला जाण्यास सांगितले असता त्यावेळी
आर्थिक फसवणूक झाल्यांची रक्कम पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना सांगून आमचे पैसे मिळवून देण्यासाठी विनवणी केली.या पाठोपाठ आर्थिक फसवणूक झालेल्यांनी
पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली असता मोठे घबाड समोर आले.याबाबत आर्थिक फसवणूक झाल्याची माहिती यांनी दिली.
याप्रकरणी तीन संशयित आरोपीना अटक करण्यात आली असून तिघांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे तर गुन्ह्यातील दोन संशयित आरोपी फरार आहेत.पोलीस पथक दोघांचा शोघ घेत आहे.आथिर्क फसवणूक प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.























