भुसावळ :(निलेश फिरके) शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील पंधरा बंगला व निर्मल नर्सरी परिसरातील एका तरुणाविरुद्ध अमरावती येथील गाडगे नगर पोलीस ठाण्यात पोस्को कायद्यान्वये गु,.र.न.२०६/२०२६ कलम ७८,७५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील संशयित आरोपी भुसावळ शहरातील असल्याची माहिती मिळाल्यानंतर अमरावती पोलिसांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या सहकार्याने संयुक्त कारवाई केली.
या कारवाईदरम्यान साहिल जमुनादास खरारे (वय २३) याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास अमरावती पोलिसांकडून सुरू असून प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.




































