भुसावळ – येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मौदानाच्या समोरील भुसावळ वाहतुक शाखेच्या कार्यालयात जिल्ह्यातील अवजड वाहनांच्या मार्गात बदल करण्यात आल्याची माहिती भुसावळ शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश.आर.महाले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्री स्वामीनारायण मंदिर, जळगांव “मूर्ती प्रतिष्ठा महोत्सव” जळगांव शहरात दूरदर्शन टॉवर भुसावळ रोड,या ठिकाणी १० ते १७ डिसेंबर २०२४ या कालावधीत संपन्न होणार असून जिल्ह्यातील वाहतूक मार्गावर मा.पोलीस अधीक्षक यांनी १९५१ च्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम,कलम ३३(१) (बी) नुसार जळगांव जिल्ह्यातील फक्त अवजड वाहनांच्या विनियमनासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी १० ते १७ डिसेंबर २०२४ पर्यंत सकाळी ०७.०० ते रात्री ११.०० वाजे पावेतो वाहतूक मार्गात बदल करण्याचे आदेश दिलेले आहेत.
सदरील भुसावळ कडुन धुळ्याकडे जाणारी वाहनांसाठी पर्यायी मार्ग नाहाटा कॉलेज, जामनेर,नेरी,वावडदा म्हसावद, एरंडोल मार्गे वळविण्यात आलेली आहेत.तसेच भुसावळ कडुन जळगावकडे जाणारी वाहनांसाठी पर्यायी मार्ग नाहाटा कॉलेज जामनेर, नेरी अजिंठा चौक मार्गे वळविण्यात आलेली आहेत. धुळ्याकडून मुक्ताईनगर व संभाजीनगरकडे जाणारी वाहनांसाठी पर्यायी मार्ग एरंडोल, म्हसावद,वावडदा,नेरी जामनेर मार्गे वळविण्यात आलेली आहेत.जळगाव शहरातून भुसावळ कडे जाणारी वाहनांसाठी पर्यायी मार्ग अजिंठा चौक, नेरी, जामनेर मार्गे वळविण्यात आले आहे.




































