Homeआरोग्यबेकायदेशीर नायलॉन मांजा शहरात विक्री करणाऱ्या आरोपीला गुन्हेशाखेने मुद्देमालासह केली अटक

बेकायदेशीर नायलॉन मांजा शहरात विक्री करणाऱ्या आरोपीला गुन्हेशाखेने मुद्देमालासह केली अटक

नायलॉन मांजाचे 24 गट्टू/दोऱ्याचे रील्स् ताब्यात घेण्यात आले असे एकूण 24,000/- रुपये किंमतीचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला..

पोलीस वार्ता, नाशिक : शहर परिसरात आगामी मकर संक्रांति सणाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पतंग उडविले जाते यासाठी वापरला जाणारा नायलॉन मांजा हा पक्षांना व प्राणीमात्रांना जखमी करून जीव घेणार ठरतो आहे. यासाठी असा घातक नायलॉन मांजा बेकायदेशीररित्या निर्मिती, साठा, विक्री आणि वापर करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश नाशिक शहर पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी शहर पोलीस गुन्हेशाखा व संबंधित पोलीस ठाण्याना दिले आहेत.
त्यानुसार शहरात नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेत असतांना नाशिक शहर गुन्हेशाखा युनिट-1 च्या पथकातील पोह. संदीप भांड व पोह. प्रदिप म्हसदे यांना गुप्त माहिती मिळाली की, शहरातील अजमेरी मज्जीद जवळ, चव्हाटा, जुने नाशिक या ठिकाणी मोकळ्या जागेत आडोश्याला एक इसम पतंग उडविण्यासाठी बंदी असलेला नॉयलॉन मांजा विक्री करीत आहे. सदर माहिती शहर गुन्हेशाखा युनिट-1 चे वपोनि डॉ.अंचल मुदगल यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनात कारवाईचे आदेश मिळाले.
शहर गुन्हेशाखा युनिट-1 च्या पथकाने माहितीच्या आधारे बातमीची खात्री करून अजमेरी मज्जीद जवळ जुने नाशिक येथे सापळा लावला, तिथे एक संशयित हिरव्या रंगाच्या प्लास्टिकच्या गोणीमध्ये पतंग उडविण्यासाठी लागणाऱ्या नॉयलॉन मांजाची/दोऱ्याची विक्री करतांना आढळून आला. त्याला पोलीस पथकाने ताब्यात घेवून त्याचे नाव, गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अजिम मोहम्मद इकबाल शेख (वय-40), रा- 3914 अजमेरी मज्जीद जवळ, चव्हाटा, नाईकवाडी पुरा, जुने नाशिक असे सांगितले. त्याच्या जवळून बंदी असलेल्या नायलॉन मांजाचे 24 गट्टू/दोऱ्याचे रील्स् ताब्यात घेण्यात आले असे एकूण 24,000/- रुपये किंमतीचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला. आरोपी विरुध्द शहरातील भद्रकाली पोलीस ठाण्यात पर्यावरण(संरक्षण) कायदा 1986 चे कलम 5, 15 सह भा.न्या.सं. 2023 चे 223, 292, 293 तसेच मपोकाक 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त नाशिक शहर संदिप कर्णिक साहेब, मा.पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, मा.सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक पोलीस गुन्हेशाखा युनिट-1 कडून करण्यात आली. पथकात पोउनि. चेतन श्रीवंत, पोह. प्रदिप म्हसदे, प्रविण वाघमारे, विशाल काठे, प्रशांत मरकड, विशाल देवरे, मिलींदसिंग परदेशी, नाझीमखान पठाण, रोहिदास लिलके, पोअं. मुक्तार शेख, उत्तम खरपडे, मपोह. शर्मीला कोकणी, मपोअं. मनिषा सरोदे, चालक पोह सुकाम पवार यांचा समावेश होता.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्यात ढगाळ हवामान, मेघगर्जनेसह वादळी पाऊस, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सतर्कता इशारा!

संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ते प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन.. पोलीस वार्ता, मुंबई : राज्यात पश्चिम भागात, घाट परिसर, खानदेश, मराठवाडा...

सोशल मीडियावर कोणतीही अफवा शेअर करताना खबरदारी बाळगावी -नाशिक पोलीस!

महिला छळ प्रकरणात पोलिसांनी तात्काळ व कठोर कारवाई केली असून नागरिक, माध्यमांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल पोलिसांनी आभार व्यक्त केले.. पोलीस वार्ता, नाशिक : शहरात घडलेल्या एका...

बैंक सुरक्षा को लेकर बुरहानपुर पुलिस अलर्ट

0
बुरहानपुर पुलिस द्वारा जिले में बैंकों की सुरक्षा व्यवस्था का निरीक्षण बैंक सुरक्षा चेकिंग को लेकर थाना प्रभारियों एवं स्टाफ ने किया व्यापक निरीक्षण दिनांक 18.04.2026...

“बुरहानपुर पुलिस का अनोखा अभियान

0
‘सृजन, सम्मान और अभिमन्यु’ से बालिकाओं को बनाया सशक्त” बुरहानपुर, 18 अप्रैल 2026 (प्रेस नोट): महिलाओं एवं बालिकाओं की सुरक्षा और सशक्तिकरण के उद्देश्य से बुरहानपुर...

जल गंगा संवर्धन अभियान

0
प्रभारी मंत्री श्री सिलावट ने किया हसनपुरा तालाब गहरीकरण कार्य का शुभारंभ प्रभारी मंत्री श्री तुलसीराम सिलावट ने ग्रामीणजनों के बीच बैठकर किया संवाद बुरहानपुर/18 अप्रैल,...

error: Content is protected !!