Homeआरोग्यकापसाची टोकण पद्धत बंद करून थेट कापूस खरेदी करण्याचा निर्णय, नवनिर्वाचित आमदार...

कापसाची टोकण पद्धत बंद करून थेट कापूस खरेदी करण्याचा निर्णय, नवनिर्वाचित आमदार संजय देरकर यांनी घेतला..

नवनिर्वाचित आमदार संजय देरकर यांनी बाजार समितीच्या सभागृहात सर्व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत दिलेल्या या आदेशामुळे वणी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

वणी विधानसभा महाविकास आघाडीचे शिवसेना (उबाठा) गटाचे नवनिर्वाचित आमदार संजय देरकर..
पोलीस वार्ता, वणी | यवतमाळ, वणी येथील सीसीआय (कृषि उत्पन्न बाजार समिती) कडून खरेदी करण्यात येत असलेल्या कापसाची टोकण पद्धत बंद करून थेट कापूस खरेदी करण्याचा निर्णय महाविकास आघाडीचे शिवसेना (उबाठा) गटाचे नवनिर्वाचित आमदार संजय देरकर यांनी घेतला आहे. 27 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता बाजार समितीच्या सभागृहात सर्व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत दिलेल्या या आदेशामुळे वणी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांनी सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, त्यांना आपला कापूस बाजार यार्डमध्ये आणावा, ज्यामुळे कापूस विक्री प्रक्रियेत सुधारणा होईल आणि शेतकऱ्यांना अधिक लाभ होईल.
आमदार संजय देरकर यांचे समितीचे सचिव यांनी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
वणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सीसीआयद्वारे शासकीय कापूस खरेदी हमी भावावर सुरू असलेल्या प्रक्रियेत शेतकऱ्यांना टोकण पद्धतीमुळे मोठ्या मनस्तापाचा सामना करावा लागत होता. याबाबत माहिती मिळाल्यावर नवनिर्वाचित आमदार संजय देरकर यांनी मुंबईवरून घरी न येता थेट कृषी उत्पन्न बाजार समिती गाठली. त्यावेळी टोकणसाठी रांगेत उभ्या असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी पाहून त्यांनी तत्काळ समितीचे सचिव झाडे, सीसीआय केंद्र प्रमुख हेमंत ठाकरे, सोयाबीन खरेदी व्यवस्थापक प्रकाश पचारे, आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली.
आमदार संजय देरकर यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांचा सखोल विचार करून, टोकण पद्धतीची आवश्यकता नाही असे ठरवले. त्यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन खरेदी करतांना आवश्यक कागदपत्रांसह सरळ मार्केट यार्डमध्ये कापूस आणण्याचे आदेश दिले. यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या शेताचा 7/12 उतारा, आधार लिंक असलेले बँक बुक आणि 2024-25 च्या पेरवे पत्रकासोबत कापूस आणावा लागेल. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्व शेतकऱ्यांनी टाळ्यांचा गजर करून आमदार संजय देरकर यांच्या निर्णयाचे स्वागत केले.
वणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन आणि कापूस खरेदीसाठी नवनिर्वाचित आमदार संजय देरकर यांनी काही महत्त्वाचे निर्देश दिले. सोयाबीन खरेदीच्या संथगतीला वेग देण्यासाठी त्यांनी दररोज 100 वाहने खरेदी करण्याचे सुचवले आहे, आणि आजपासून ही पद्धत लागू करण्याचे आदेश दिले. सोयाबीनला शासनाचा हमीभाव 4892 रुपये मिळत असून, कापसाला 7521 रुपये मिळत आहेत. तथापि, सीसीआय आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियोजनातील काही त्रुटीमुळे शेतकऱ्यांना मानसिक त्रास होत आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांना कोणताही त्रास न होता सुलभ पद्धतीने कापूस व सोयाबीन खरेदी करण्याची व्यवस्था लागू करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार संजय देरकर यांच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रवेश करताच समितीचे सचिव यांनी त्यांचे स्वागत शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन केले. यावेळी झरि कु.ऊ.बा.स.चे सभापती राजीव कसावार, सुनील कातकडे, संजय निखाडे, प्रशांत पाचभाई, दिलीप भोयर, शरद ठाकरे, देवराव धांडे, सुधीर थेरे, माजी सभापती संतोष कुचनकर, प्रवीण खानझोडे, सतीश वऱ्हाटे, घनश्याम पावडे, अजय कवरासे, आणि अनेक शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा मानसिक त्रास कमी होईल आणि सोयाबीन व कापूस खरेदीची प्रक्रिया अधिक सुलभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: नरेश ठाकरे, (वणी) यवतमाळ, संपर्क: 9588664532
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्यात ढगाळ हवामान, मेघगर्जनेसह वादळी पाऊस, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सतर्कता इशारा!

संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ते प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन.. पोलीस वार्ता, मुंबई : राज्यात पश्चिम भागात, घाट परिसर, खानदेश, मराठवाडा...

सोशल मीडियावर कोणतीही अफवा शेअर करताना खबरदारी बाळगावी -नाशिक पोलीस!

महिला छळ प्रकरणात पोलिसांनी तात्काळ व कठोर कारवाई केली असून नागरिक, माध्यमांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल पोलिसांनी आभार व्यक्त केले.. पोलीस वार्ता, नाशिक : शहरात घडलेल्या एका...

बैंक सुरक्षा को लेकर बुरहानपुर पुलिस अलर्ट

0
बुरहानपुर पुलिस द्वारा जिले में बैंकों की सुरक्षा व्यवस्था का निरीक्षण बैंक सुरक्षा चेकिंग को लेकर थाना प्रभारियों एवं स्टाफ ने किया व्यापक निरीक्षण दिनांक 18.04.2026...

“बुरहानपुर पुलिस का अनोखा अभियान

0
‘सृजन, सम्मान और अभिमन्यु’ से बालिकाओं को बनाया सशक्त” बुरहानपुर, 18 अप्रैल 2026 (प्रेस नोट): महिलाओं एवं बालिकाओं की सुरक्षा और सशक्तिकरण के उद्देश्य से बुरहानपुर...

जल गंगा संवर्धन अभियान

0
प्रभारी मंत्री श्री सिलावट ने किया हसनपुरा तालाब गहरीकरण कार्य का शुभारंभ प्रभारी मंत्री श्री तुलसीराम सिलावट ने ग्रामीणजनों के बीच बैठकर किया संवाद बुरहानपुर/18 अप्रैल,...

error: Content is protected !!