भुसावळ – पुणे लोहमार्ग पोलीस ठाणे हद्दीतील रेल्वे फलकावरून अनोळखी चार इसमांनी अंदाजे वीस लाख रुपये रोकड असलेली ट्रॅव्हलिंग बॅगची गुरुवार (ता.१६) ऑक्टोबर रोजी चोरी करून पसार झाले होते.याबाबत लोहमार्ग पोलीस ठाणे पुणे येथे चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.पोलिसांनी तपास चक्र फिरवीत गुन्ह्यातील चार संशयित निष्पन्न करीत भुसावळातील चौघांना अटक केली.
पुणे रेल्वे फलकावर प्रवासी उभा असतांना चार अनोळखी इसमांनी २० लाख रुपये रोकड असलेली ट्रॅव्हलिंग बॅग चोरून नेल्याची घटना ता.१६ ऑक्टोबर रोजी घडली.याबाबत प्रवाशांने रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाणे पुणे येथे गु.र.न.४३४/२०२५ बी.एन.एस.३०३(२),३(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.या गुन्ह्यातील संशयित आलू ऊर्फे हरिष शर्मा यास नागपूर तर वसीम सैय्यद व कलीम शेख या दोघांना अजमेर तसेच तस्लिम शेख यास श्रीरामपूर अहिल्यादेवी नगर येथून अटक केली.सर्व राहणार भुसावळ येथील आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनिरी.रनवरे करीत आहे.लोहमार्ग पोलिसांनी संशयितांकडून दीड लाख रुपये हस्तगत केले.
चौकट….
रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाणे चे पोउपनिरी.रनवरे व पथक उर्वरित रक्कम हस्तगत करण्याकामी संशयित वसीम सैय्यद यास सोबत घेवून रविवार (ता.२) नोव्हेंबर रोजी भुसावळ गाठले.भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील जामनेर रोडवरील दीनदयाल नगर मधील रहिवासी संशयित वसीम सैय्यद यांची घरांची झडती घेतली.मात्र गुन्ह्यातील रक्कम मिळून न आल्याने उलटे पाऊली अधिकारी व पथक पुणे रवाना झाले.


























