Homeआरोग्य'चर्च ऑफ गॉड' या सामाजिक संस्थेकडून नाशिक शहरात स्वच्छता अभियानाद्वारे पर्यावरण रक्षणासाठी...

‘चर्च ऑफ गॉड’ या सामाजिक संस्थेकडून नाशिक शहरात स्वच्छता अभियानाद्वारे पर्यावरण रक्षणासाठी योगदान..

सकाळी 10 वाजता, नाशिक न्यू सेंट्रल मेळा बसस्थानकावर ‘चर्च ऑफ गॉड’ या संस्थेच्या सदस्य, त्यांचे कुटुंबीय आणि अन्य सहकारी असे एकूण 130 स्वयंसेवकांनी तीन तासांहून अधिक वेळ साफसफाई मोहीम राबवली..

पोलीस वार्ता, नाशिक : प्राचीन सभ्यता आणि आधुनिकता शेजारी अस्तित्वात असलेले नाशिक शहर, महाराष्ट्राभरात ‘चर्च ऑफ गॉड’ वर्ल्ड मिशन सोसायटीच्या वतीने दि. 23 मार्च 2023 रोजी शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. बदलत्या हवामान संकटाचा सामना करण्यासाठी आणि सजीव सृष्टीच्या अस्तित्वासाठी पर्यावरणाचे संरक्षण उपक्रम योजिले आहे. ‘आम्ही पृथ्वीच्या शाश्वत भविष्यासाठी, जीवनाचे माहेरघर म्हणून विविध पर्यावरण संरक्षण उपक्रम राबवत आहोत. आम्हाला आशा आहे की यामुळे नाशिक शहराचे सौंदर्य पुनर्संचयित करण्यात मदत होईल आणि नागरिकांमध्ये पर्यावरणविषयक जागरूकता वाढेल. असे वक्तव्य संस्थेच्या एका अधिकाऱ्याने केले आहे.
दि. 23 रोजी, सकाळी 10 वाजता, नाशिक न्यू सेंट्रल मेळा बसस्थानकावर ‘चर्च ऑफ गॉड’ या संस्थेच्या सदस्य, त्यांचे कुटुंबीय आणि अन्य सहकारी असे एकूण 130 स्वयंसेवकांनी तीन तासांहून अधिक वेळ साफसफाई मोहीम राबवली यात बसस्थानकाचा जवळपास 400 मीटर अंतराचा परिसर स्वच्छ करून कचरा मुक्त केला. यावेळी प्लास्टिक कप, पॉलिथिन पिशव्या, स्ट्रॉ, स्नॅक पॅकेट, पाण्याच्या व कोल्ड्रिंक्सच्या प्लास्टिक बाटल्यांसह सुमारे 100 किलो कचरा जमा झाला होता. न्यू सेंट्रल मेळा बस स्थानक शहराच्या मध्यभागी असून येथे ये-जा करणाऱ्या प्रवाश्यांची मोठी वर्दळ असते तरी देखील कोणात्याही प्रवाशाला अथवा वाहनाला अडथळा न ठरता ही स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या संपन्न झाली.
नाशिक महानगरपालिकेने देखील या स्वच्छता उपक्रमाचे स्वागत करून संस्थेला स्वच्छता उपकरणे पुरवली. या मोहिमे दरम्यान बस आगार अधिकारी श्री महाजन म्हणाले, संस्थेचे हे कार्य खरोखरच कौतुकास्पद व उल्लेखनीय आहे. तसेच माजी नगरसेवक श्री संतोष साळवे यांनीही या स्वच्छता कामाचे कौतुक केले. यापूर्वी देखील ‘चर्च ऑफ गॉड’ने आतापर्यंत पर्यावरण संरक्षण, कल्याणकारी प्रोत्साहन, आपत्कालीन मदत आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यासारखे कार्य सातत्याने केले आहे, ज्यामुळे स्थानिक समुदायांशी चांगले संबंध संस्थेने निर्माण केले आहे. अश्या सामाजिक उपक्रमांसाठी संस्थेला राज्यसभा खासदार, महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य, पुणे व पिंपरी-चिंचवडचे नगरसेवक आणि मुंबईचे महापौर ह्या मान्यवरांकडून पुरस्कार मिळाले असून कामाची प्रशंसा देखील करण्यात आली आहे.
नाशिक मधील हे एकमेव चर्च आहे जे इ.पूर्व 2 हजार वर्ष, प्रभू येशू ख्रिस्ताच्या उदाहरणांचे अनुसरण करून नवीन सामाजिक विचारांचा ‘वल्हांडण’ (यहुदी धर्मातील एक महत्त्वाचा सण) सण साजरा करते. ख्रिस्ताने सांगितले आहे की, जर प्रत्येकजण आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम करायला शिकला, तर समाजात गैरसमज, द्वेष आणि भांडणे कमी होतील आणि एक चांगले व शांत जीवन जगता येईल. याच विचाराने आतापर्यंत ‘चर्च ऑफ गॉड’ या संस्थेने 30 हजार सामाजिक उपक्रमात योगदान दिले आहे. चर्च युनायटेड स्टेट्सच्या तीन सरकारांकडून राष्ट्रपती स्वयंसेवक पुरस्कार, कोरियाच्या तीन सरकारांकडून राष्ट्रपती पुरस्कार, युनायटेड किंगडमचा राणीचा स्वयंसेवक सेवा पुरस्कार, ब्राझीलचे लेजिस्लेटिव्ह मेरिट मेडल, पेरूचे काँग्रेसनल मेडल ऑफ ऑनर, आणि नॅशनल हायएस्ट एन्व्हिरन हे पुरस्कार यासह पाच हजारहून अधिक पुरस्कार संस्थेला आजपर्यंत मिळाले आहेत.

✍️पोलीस वार्ता संपादक: उमेश फिरके, नाशिक, संपर्क- 9637519059
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विकास कैथवास का हर्षोल्लास से मनाया जन्मदिन

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा में सोमवार शाम को युवा समाजसेवी एवं मिलनसार स्वभाव के धनी विकास कैथवास का 42 वा जन्मदिन उनके...

सावकारी परवाना प्रकरणात सहाय्यक अधिकारीसह तिघांवर लाचलुचपतची कारवाई

0
भुसावळ, ता. १५ : सावकारी व्यवसायासाठी परवाना काढून देण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी व दोन प्रमाणित...

बलात्कार के केस का स्थाई वारंटी को किया गिरफ्तार

0
शाहपुर रमाकांत मोरे । पुलिस ने दिनांक 13/06/2026 को ग्राम सांभरपुरा के स्थाई वारंटी राजेश उर्फ राजू पिता मांगीलाल डावर को गिरफ्तारी करने के संबंध...

जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर...

0
जळगाव : जिल्हा पुरवठा विभागात भ्रष्टाचार, मनमानी, सर्वसामान्यांची आर्थिक पिळवणूक सुरू असतांना प्रभावहीन प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याची गंभीर परिस्थिती असल्याने याबाबत तातडीने चौकशी...

वन विभाग ने बड़ी कार्रवाई

0
बुरहानपुर में वन विभाग ने बड़ी कार्रवाई करते हुए प्रतिबंधित सलाई गोंद की तस्करी का पर्दाफाश किया है। जानकारी के अनुसार वन परिक्षेत्र बोदरली...

error: Content is protected !!