2 मे 2025, शुक्रवार रोजी केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडतील, त्यासाठी भाविकांचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन 2 मार्च 2025 पासून चालू झाले आहे..

पोलीस वार्ता, उत्तराखंड : वर्ष 2025 मधील केदारनाथ धाम यात्रा लवकरच सुरू होणार असून 26 फेब्रुवारी महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याची तारीखवडेखील जाहीर करण्यात आली आहे.
तर संक्षिप्त तपशील जाणून घ्या, कोणत्या दिवशी दरवाजे उघडले जातील आणि तुम्ही केदारनाथ यात्रेला कधी जाऊ शकता.
उत्तराखंड राज्यातील डोंगरांच्या सानिध्यात उंचावर केदारनाथ मंदिर स्थित आहे. भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे एक आहे. येथे भगवान शिवाचे म्हणजे बाबा केदारनाथचे दर्शन घेण्यासाठी लोक मंदिराचे दरवाजे उघल्यावर येथे रजिस्ट्रेशन करून येतात. संपूर्ण भारतातून येथे भक्त येतात. हिवाळ्यात याठिकाणी प्रचंड बर्फवृष्टी होत असल्याने या दिवसांत केदारनाथ मंदिराचे दरवाजे बंद असतात. उन्हाळ्याचे आगमन होताच बाबा केदारनाथ धामचे दरवाजे पुन्हा एकदा उघडले जातात. नुकत्याच झालेल्या महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्याची दिनांक घोषित करण्यात आली. त्यानुसार दि.2 मे 2025, शुक्रवार रोजी केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडतील. त्यासाठी भाविकांचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन 2 मार्च 2025 पासून चालू झाले आहे.

-
लिंक : 👉 केदारनाथ यात्रा रजिस्ट्रेशन
-
केदारनाथ धाम मंदिराचे दरवाजे कश्या प्रकारे उघडतात?
केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यापूर्वी 27 एप्रिल रोजी उखीमठच्या ओंकारेश्वर मंदिरात भैरव पूजेचे आयोजन केले जाईल. यानंतर ‘बाबा केदारनाथ’ यांच्या पालखीचे केदारनाथ धाम मंदिराकडे प्रस्थान होईल. बाबा केदारनाथची डोली 28 एप्रिलला गुप्तकाशीला नेली जाईल नंतर 29 एप्रिलला फाटा आणि 30 एप्रिलला बाबा केदारनाथची डोली गौरीकुंडला पोहोचेल. बाबा केदार यांची पालखी 1 मे रोजी केदारनाथला पोहोचेल आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी 2 मे रोजी सकाळी 7 वाजता केदारनाथ मंदिराचे दरवाजे भक्तांसाठी उघडले जातील. यावेळी बाबा केदारनाथच्या जयजयकाराने व ढोल-ताशांचा नाद गुंजुन परिसर भक्तिमय होतो. विधीनुसार बाबा केदारनाथची पूजा शैव लिंगायत पद्धतीनुसार केली जाते.

-
केदारनाथ यात्रेची तयारी व आवश्यक सूचना!
-
मे ते जून आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यात दरम्यान केदारनाथ यात्रा करण्याचा सर्वोत्तम वेळ आहे.
-
थंड हवामान असल्याने गरम कपडे सोबत न्यावे, हवामानात दिवसानुसार बदल होऊ शकते. बर्फवृष्टी व पाऊस हे बदल सामान्य आहे येथे.
-
यात्रेदरम्यान कोणाला काही वैद्यकीय समस्या असेल तर त्यावर लक्षात ठेवा, प्रथमोपचाराच्या वस्तू आणि जरुरीचे औषधे सोबत घेण्यास विसरू नका.

-
यात्रेसाठी आवश्यक परवाने व स्वतःची ओळखपत्रे हे प्रवासा दरम्यान प्रत्येकाने स्वतः सोबत ठेवावी.
-
केदारनाथ यात्रा करतेवेळी डोंगरावर चालण्याच्या दृष्टीने योग्य पादत्राणेच, बूट-चप्पल घाला, तसेच योग्य कपडे घाला ज्याने चालणे सोपे होईल.
-
एकादी टॉर्च, तसेच दिशा सूचक, फ्लॅशलाइट आणि हेडलॅम्प इत्यादी सोबत ठेवा, तसेच यात्रेदरम्यान ग्रुपमध्ये सोबत चाला,
-
डोंगर व हवामान यामुळे नेटवर्क कमी मिळते त्यामुळे ऑनलाइन पेमेंटवर पूर्णपणे अवलंबून राहू नका, रोख रक्कम सोबत ठेवा.





































