नवनिर्वाचित आमदार संजय देरकर यांनी बाजार समितीच्या सभागृहात सर्व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत दिलेल्या या आदेशामुळे वणी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलीस वार्ता, वणी | यवतमाळ, वणी येथील सीसीआय (कृषि उत्पन्न बाजार समिती) कडून खरेदी करण्यात येत असलेल्या कापसाची टोकण पद्धत बंद करून थेट कापूस खरेदी करण्याचा निर्णय महाविकास आघाडीचे शिवसेना (उबाठा) गटाचे नवनिर्वाचित आमदार संजय देरकर यांनी घेतला आहे. 27 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता बाजार समितीच्या सभागृहात सर्व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत दिलेल्या या आदेशामुळे वणी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांनी सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, त्यांना आपला कापूस बाजार यार्डमध्ये आणावा, ज्यामुळे कापूस विक्री प्रक्रियेत सुधारणा होईल आणि शेतकऱ्यांना अधिक लाभ होईल.



























