भुसावळ – तालुक्यातील दिपनगर औष्णिक विद्युत केंद्रामधून पन्नास टन राख विना परवाना लबाडीच्या इराद्याने चोरल्याची घटना ता.८ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. विजय शिवराम माळी रा वडनेर दुमला ता जि. नाशिक असे संशयितांचे नाव आहे.
नाशिक जिल्ह्यातील दुमला तालुक्यातील वडनेर येथील रहिवासी विजय शिवराम माळी हा दिपनगर औष्णिक विद्युत केंद्रामध्ये राख घेण्यासाठी ता.८ रोजी आला.५० टन राख ९६५० रुपये किंमतीची वाहनात भरून उपकार्यकारी अभियंता माधव गोविंदराव केंद्रे यांचे संमतीशिवाय विना परवाना लबाडीच्या ईराद्याने चोरलेली आहे.रात्री ८:०० वाजता किन्ही ता भुसावळ चौफुलीवर पोलिसांनी ताब्यात घेतले.माधव गोविंदराव केंद्रे ( वय ३५) उपकार्यकारी अभियंता रा.डी. एम.४/२ दिपनगर ता भुसावळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस स्टेशनला राख चोरीचा हा पहिलाच गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.तपास पोहेकॉ कैलास बाविस्कर करीत आहे.


























