हैदराबाद:
लोकप्रिय तेलुगू अभिनेता अल्लू अर्जुन याला त्याच्या ‘पुष्पा 2: द राइज’ चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यान एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. टेलिव्हिजनवर दाखवण्यात आलेल्या फुटेजमध्ये कडेकोट बंदोबस्तात अभिनेत्याला पोलिस वाहनात नेले जात असल्याचे दिसले. गेल्या आठवड्यात येथे चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला होता आणि एक मुलगा जखमी झाला होता.




































