Homeआरोग्यचौथे विश्व मराठी संमेलन स्थळी मराठी भाषा गौरव दिनी 42 मौलिक ग्रंथांचे...

चौथे विश्व मराठी संमेलन स्थळी मराठी भाषा गौरव दिनी 42 मौलिक ग्रंथांचे प्रकाशन!

‘पुस्तक प्रकाशन’ हे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे मुख्य उद्दिष्ट असून आजवर मंडळाने 730 हून अधिक ग्रंथ प्रकाशित केले..

पोलीस वार्ता, नाशिक : चौथे विश्व मराठी संमेलन 27 फेब्रुवारीपासून शहरात सुरू होणार आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त 42 मौलिक ग्रंथांचे प्रकाशन या संमेलन प्रसंगी करण्यात येणार आहे. ‘पुस्तक प्रकाशन’ हे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे मुख्य उद्दिष्ट असून आजवर मंडळाने 730 हून अधिक ग्रंथ प्रकाशित केले असून दरवर्षी मराठी भाषा गौरव दिनी नव्या ग्रंथांचे प्रकाशन करण्याची परंपरा जपली आहे. गंभीर, वैचारिक, संशोधनपर आणि मौलिक विषयांवरील ग्रंथनिर्मिती सातत्याने केली जात आहे. खासगी प्रकाशकांकडून सहसा प्रकाशित न होणारे उच्च दर्जाचे संशोधनात्मक ग्रंथ प्रकाशित करण्याची जबाबदारी मंडळ पार पाडत आहे.
वारकरी परंपरेतील संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांच्या ‘तुकारामबावांच्या अभंगाची गाथा’ या ग्रंथाचा समावेश यंदाच्या 42 ग्रंथांमध्ये विशेष उल्लेखनीय आहे. तसेच अंजली मालकर लिखित ‘हिंदुस्थानी अभिजात संगीताचा इतिहास’ (पूर्वार्ध व उत्तरार्ध) या दोन खंडांत तेराव्या शतकापासून स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंतच्या संगीत प्रवासाचा अभ्यासपूर्ण आढावा घेतला आहे.
मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्यावरील ‘दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर – कर्तृत्वाचा एक शोध’ हे तीन खंड प्रकाशित होत असून, त्यातील तिसऱ्या खंडात त्यांनी प्रथम मुद्रित केलेली ‘ज्ञानेश्वरी’ समाविष्ट आहे. ‘शिवशक्ती संप्रदायाची लोक-गान परंपरा’, ‘महाराष्ट्राचे शिल्पकार विद्वत्तेचा महामेरु डॉ. सी. डी. देशमुख’, ‘मराठीतील रहस्य-रंजनप्रधान लोकप्रिय कादंबरी परंपरा आणि प्रवाह’, तसेच ओडिसी नृत्यशैलीवरील ‘ओद्रमागधी ते ओडिसी नृत्य – एक प्रवास’ हेही ग्रंथ प्रकाशित होत आहेत.
साहित्यिक परिचय मालिका
1940 ते 1990 या कालखंडातील महत्त्वाच्या साहित्यिकांवर आधारित परिचयात्मक ग्रंथमालिकेतील ग्रंथांचाही समावेश आहे. यात पु.ल.देशपांडे, नामदेव ढसाळ, विंदा करंदीकर, अण्णाभाऊ साठे, नारायण सुर्वे आदी साहित्यिकांच्या जीवन व साहित्याचा मागोवा घेण्यात आला आहे. तसेच ‘रायगडची जीवनकथा’ या ग्रंथाचे आठवे पुनर्मुद्रण प्रकाशित होत असून या ग्रंथाला वाचकांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे.
नवलेखकांना संधी
मंडळाच्या ‘नवलेखक अनुदान’ योजनेअंतर्गत यंदा 19 नवोदित लेखकांची पुस्तके प्रकाशित होत आहेत. काव्य, कथा, कादंबरी, नाटक, ललितगद्य आणि बालवाङ्मय अशा विविध साहित्यप्रकारांतील ही पुस्तके असून नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा मंडळाचा हा उपक्रम विशेष उल्लेखनीय आहे.

ग्रंथ ऑनलाईनही उपलब्ध
मंडळाचे सर्व ग्रंथ https://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच शासकीय मुद्रणालय व खाजगी वितरकांकडेही अत्यल्प दरात हे ग्रंथ उपलब्ध आहेत. वाचकांच्या भरघोस प्रतिसादामुळे अनेक ग्रंथांचे पुनर्मुद्रण करावे लागत असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले. या प्रकाशन सोहळ्यामुळे मराठी साहित्य-संस्कृतीच्या जतन व संवर्धनाला मोठी चालना मिळणार आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आगर टाकळी येथील मनपा शाळा क्र. 47 मध्ये मूलभूत हक्कांची आणि कर्तव्यांची कायदेविषयक कार्यशाळा

नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या मूलभूत हक्कांची आणि कर्तव्यांची तसेच विविध शासकीय विधी, योजनांची माहिती.. पोलीस वार्ता, नाशिक : शहरातील एन बी ठाकूर विधी महाविद्यालयाच्या वतीने...

नाशिक जिल्ह्यात गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत असून कोणतीही टंचाई नाही!

नागरिकांनी कुठल्याही अफवा पसरवू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.. पोलीस वार्ता, नाशिक : आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका–इराण...

आकलूद येथे शिवमहापुराण कथेदरम्यान महिलेची प्रकृती बिघडली; उष्माघाताचा प्राथमिक अंदाज

0
यावल तालुक्यातील आकलूद गावात १० मार्चपासून कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या मुखातून महाशिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेसाठी मोठा पेंडाल उभारण्यात आला...

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा; येवला येथे 18 मार्च रोजी आयोजन!

विश्वलता आर्ट, कॉमर्स ॲण्‍ड सायन्स कॉलेज भटगाव, येवला, जि.नाशिक या ठिकाणी बुधवार 18 मार्च 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत रोजगार...

जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान

0
परभणी (प्रतिनिधी) – जागतिक महिला दिनानिमित्त लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ व माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य...

error: Content is protected !!